Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर....
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
मध्य रेल्वेचं काम वेळेआधीच पूर्ण झालं आहे. आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक नियोजित होता, मात्र त्या आधीच ठाण्यातील रुंदीकरणाचे काम पूर्ण झालं. पाच नंबर प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. लवकरच अंतिम परवानगी देऊन नवीन फलाट वापरासाठी खुला केला जाणार आहे.
एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा राहत असलेल्या घरातच मृतदेह आढळून आला. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी इथं उघडकीस आली. मनोहर महागु निमजे (80) आणि पत्नी मीरा मनोहर निमजे (70) असं मृतक वृद्ध दांपत्यांचं नाव आहे. मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून दरम्यान वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हयात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, येत्या 2-3 दिवसात तो कर्नाटकात पोहचण्याचा अंदाज आहे. 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह सिंधुदुर्गातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होणार रत्नागिरीमध्ये दाखल होत आहेत. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोषाची जोरदार तयारी केली जात आहेत. रत्नागिरीतील हॉटेल्स बुक करण्यासाठी राणे समर्थकांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. महायुती आणि भाजपसह नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी भल्या पहाटे सुरू केली आहे. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तासच उरले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचं पहायला मिळालं. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. यावरूनच कोणाचा विजय होवो न होवो इंदापूरकरांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.
दुपारी 12.30 पर्यंत ठाण्यातील रेल्वे ट्रॅकचं काम पूर्ण होणार आहे, त्याआधी सर्व चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करणार असल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं. आता देखील ट्रॅक पूर्ण तयार असून सिमेंट सुकण्यासाठी काही वेळ दिला जात आहे, त्यामुळे लवकरच मेगाब्लॉक संपणार आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू असणार आहे, मात्र रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळे आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे,
सीएसएमटी स्थानकात शुक्रवार रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आल्याने सर्व लोकल या परेल आणि भायखळा स्थानकापर्यंत धावत आहेत, तसेच हार्बर लाईनवर केवळ वडाळा स्थानकापर्यंतच लोकल धावत आहेत. आज रविवारचे वेळापत्रक असून देखील 235 लोकल रद्द करण्यात आले आहेत, तसेच 31 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, याचा काही प्रमाणात फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या पनवेल, कल्याण आणि ठाणे स्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -