Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jun 2024 03:29 PM
कल्याणी नगर अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालची पोलीस चौकशी सुरू

कल्याणी नगर अपघात प्रकरण


अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालची पोलीस चौकशी सुरू


ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आज पुणे पोलिसांकडून शिवानी अगरवाला अटक


या मुद्द्यांवर होणार शिवानी अगरवालची चौकशी


- ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल बदलणे 


- रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटात सहभाग काय?


- पैशांची देवाण-घेवाण बद्दल आणि नेमकी किती रक्कम द्यायचं ठरलं, हे चौकशी होणार.


- रक्ताचे नेमके नमुने कुणाचे घेतले याची चौकशी करणे


- ड्रायव्हरला धमकावून डांबून ठेवणे


- गुन्ह्यातले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे

अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे दहा ते पंधरा जणांच्या टोळीकडून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.. तर किरकोळ वादातून तरुणाच्या हातापायाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... दरम्यान या मारहाणीच्या  घटनेतील आठ ते दहा जणांविरोधात लातूरच्या अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सद्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय....

मालेगाव - मनमाड रस्त्यावर ट्रक आणि टँकरमध्ये समोरा समोर धडक, टँकर चालक जागीच ठार

मालेगाव - मनमाड रस्त्यावर ट्रक आणि टँकर मध्ये समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला..या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे..ट्रक चालकास उपचारार्थ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या अपघातामुळे मालेगाव - मनमाड मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून जवळपास एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे...

बीड जिल्ह्यामध्ये 15 जून पर्यंत जमावबंदी आदेश लागू

बीड जिल्ह्यामध्ये 15 जून पर्यंत मनाई आदेश लागू..


लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.. त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत बीड जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यास बंदी असणार आहे..बीड जिल्हयामध्ये लोकसभा विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, मोर्चे, उपोषणे धरणे अंदोलने या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत..

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी पंढरपूर तळघराची आणि मूर्तीची केली पाहणी

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज पंढरपूर येथे जाऊन जुन्या मंदिराची आणि तळघराची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये मिळालेल्या मूर्तीबाबत आदिती तटकरे यांना माहिती दिली

मेगाजंबो ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांना 2-3 गाड्या बदलून करावा लागतोय प्रवास

मेगाजंबो ब्लॉकमुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होतायत. कामानिमित्तम मुंबईच्या दिशेनं येणा-यांना 2-3 गाड्या बदलून प्रवास कारावा लागतोय. अनेक स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे, त्यात असहाय्य उकाडा होतोय. तसेच विकएण्ड निमित्त मुंबईबाहेर जाणा-या तरूणाईलाही या मेगाजंबोब्लॉकचा फटका बसलाय.

शनिवार वाड्यात आढळली बेवारस बॅग, बॉम्ब शोधक पथक वाड्यावर दाखल..

शनिवार वाड्यात आढळली बेवारस बॅग 


शनिवार वाडा केला रिकामा... बॉम्ब शोधक पथक वाड्यावर दाखल...


बेवारस बॅगची तपासणी सुरु...


संशयित बॅग असल्याचं कंट्रोलला फोन...

आजपासून समुद्रातल्या मासेमारीला ब्रेक, 31 जुलैपर्यंत मासेमारी राहणार बंद

आजपासून समुद्रातल्या मासेमारीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने म्हणजेच 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद असणार आहे. परिणामी ताजे फडफडीत मासे खाणाऱ्या खवय्यांचा हिरमोड होणार आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणात होत असलेले बदल आणि परिणामी खवळलेला समुद्र तसेच माशांचा प्रजनन कालावधी यामुळे ही मासेमारी मुख्यता बंद असते. दरम्यान मासेमारी बंद झाल्यामुळे नका बंदरात विसावल्याचा चित्र सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागात दिसून येत आहे

मेगा जंबो ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील वाहतुक पूर्णपणे बंद, स्थानकात पूर्णपणे शुकशूकाट

मेगा जंबो ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील वाहतुक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कायम गजबजलेलं सीएसएमटी स्थानकात पूर्णपणे शुकशूकाट पाहायला मिळतोय. मात्र तरीही अनेकजण स्टेशन परिसरात ट्रेन पकडण्यासाठी येतायत. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची प्रत्येकाला सूचना करताना दमछाम होतेय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.