Maharashtra News LIVE Updates: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

रोहित धामणस्कर Last Updated: 14 May 2024 02:04 PM
धाराशिवच्या ग्राहकाने ठोकले ओला इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला टाळे

अवघ्या सहा महिन्यात ओला कंपनीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी बंद पडल्यानंतर कंपनीकडून दुरुस्तीस टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त ग्राहकाने कंपनीच्या शोरूमला टाळे ठोकून निषेध केला. धाराशिव येथील वैभव विश्वनाथ पाटील व गणेश विकास लावंड यांनी ओला कंपनीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी केली. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच इलेक्ट्रिक बाइक मध्ये सतत बिघाड होत असल्याने वाहन दुरुस्तीसाठी पाटील व लावंड यांनी कंपनीच्या शोरुमकडे तक्रार करून ही ओला कंपनीकडून दुरुस्त करून मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्राहकाने अखेर शोरूमला टाळे ठोकले. वाहनाची दुरुस्ती करुन दिल्याशिवाय टाळे काढणार नसल्याचा इशाराही ग्राहकांनी दिला आहे

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत: संजय राऊत

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल: संजय राऊत. सविस्तर वाचा.

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची उजवीकडील खोली क्रमांक 1 (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे ‘टपाली मतदान कक्ष (पोस्टल वोटींग सेंटर) स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आज सकाळी 9.00 वाजेपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज सकाळी या कक्षास भेट देऊन पाहणी केली.

पाणी टंचाईमुळे दुसरबीड येथील ग्रामस्थ आक्रमक

पाणीटंचाईमुळे दुसरबीड येथील नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने व टँकरने ही पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील संतप्त नागरिकांनी व महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी केली. आक्रमक नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना ही पाचारण करण्यात आल आहे मात्र जो पर्यंत पिण्यासाठी पाणी मिळणार नाही तो पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय समोर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने पाण्यासाठी वणवण

 वसमत तालुक्यातील जवळा-खंदारबन या गावांमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. सध्या मे महिना सुरू आहे राज्यभरामध्ये भीषण पाणीटंचाई आहे असे असताना  वसमत तालुक्यातील जवळा-खंदारबन या गावांमध्ये मागील दोन महिन्यापासून वीजपुरवठा सुरळीत होत नाही परिणामी गावामध्ये पाणीच मिळत नाही त्यामुळे गावातील नागरिक महिला आणि लहान मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे एक ते दीड किलोमीटर पायपीट केल्यानंतर पिण्यासाठी पाणी आणता येत आहे त्यामुळे याची तत्काळ महावितरण दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अवकाळी पावसानं लाखो रुपयांची मिरची सडली

भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालं. तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसला. तर मिरची पिकांनाही नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळालं.

मोदींच्या मुंबईतील रोड शो साठी भाजपचं प्लॅनिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो नियोजनासाठी आज बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली नियोजन समितीची बैठक.  मुलुंड येथे आज दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन.  या बैठकीला भाजपचे  पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार

लोकसभेच्या मतदानादिवशी चाकू हल्ल्यात मृत पावलेल्या समाधान पाटीलच्या कुटुंबियांना डॉ. राहुल घुगे यांचा मदतीचा हात

लोकसभेच्या मतदाना दिवशी धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील समाधान पाटील हत्या प्रकरनात मृत समाधानचं कुटुंब उघड्यावर आलं,पत्नी आई-वडील आणि तीन मुले यांचा आधार हरवला होता. मात्र, भूम येथिल डॉ राहुल घुगे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन दोन्ही मुलाचे बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेउन पत्नील खाजगी संस्थेत नोकरी दिल्याने समाधानच्या कुटुंबाला शाश्वत आधार दिला आहे. डॉक्टरांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होतोय

महाविकास आघाडीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या सभा

शरद पवार यांची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजता सभा
(९० फिट रस्ता, गोल्डन पॅलेस, कांजूरमार्ग पूर्व )


उद्धव ठाकरे यांची पालघर लोकसभा मतदारसंघात  वसई पश्चिम येथे  सायंकाळी पाच वाजता सभा
( वाय एम सी ए  मैदान नवाघर माणिकपूर वसई पश्चिम )


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात  आदित्य ठाकरे यांचा रोड शो संध्याकाळी पाच वाजता (शिवटेकडी लिंक रोड ते समर्थ नगर आनंद नगर)


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात  सायंकाळी सहा वाजता सुषमा अंधारे भाई जगताप यांची सभा
 (सायंकाळी सहा वाजता कुलाबा मार्केट)

वेंगुर्ल्यातील सातेरी देवीच्या मंदिरात हापूस आंब्यांची आरास

वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात वेंगुर्ले च्या हापूस आंब्याची सजावट करण्यात आली. संपूर्ण सातेरी मंदिराला वेगवेगळ्या जातीच्या आंब्याची सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंब्याच्या आकाराची फुलांची सजावट केल्याने संपूर्ण मंदिर परिसर हा आंब्याच्या  मंदिरात हजारो आंब्याची सजावट पूजा बांधण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान

गेल्या दोन दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटाचा जोरदार फटका बसला आहे. धाराशिव,उमरगा, लोहारा तसेच कळंब तालुक्यातील गावांतील उन्हाळी पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. १० गावांना विजांचा फटका बसलाय, याचा मोठा तडाखा पशुपालकांना बसला असून पावसाच्या थैमानात १२ जनावरांचा बळी गेला आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद मोदी यांची जाहीर सभा

महायुतीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ.भारती पवार, नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच धुळे लोकसभेचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव येथे जाहीर सभा होणार आहे..या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून भव्य असा स्टेज उभारण्यात येत आहे...दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरली असून, हा प्रश्न अधिक चिघळू नये याकरिता प्रशासनाकडून काटेकोर लक्ष दिले जात आहे. पिंपळगावची सभा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून तळ ठोकून आहे.

काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांची मालेगावात सभा

काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी नाशिकच्या मालेगावमध्ये धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत केंद्रातील भाजप सरकार जोरदार टीका केली..देशाचे संविधान व राष्ट्रपुरुषांचे बलिदान शाबूत ठेवण्यासाठी व भाजप सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनवर काँग्रेस जोरात बटन दाबून विजयी करा..२० मई भाजपा गई..अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साद घातली.

देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत. दुपारी साडेचार वाजता फडणवीस डहाणूत सभा घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांची मीरारोडमध्ये सभा होईल. तर संध्याकाळी वरळीत देवेंद्र फडणवीसांची सभा होईल. 

लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षाने  या टप्प्यात प्रचारासाठी आपली ताकद झोकून दिली. उद्या नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव येथे सभा घेत आहे. हा संपूर्ण परिसर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे.  कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचा भाव व निर्यात धोरणाला घेऊन केंद्र सरकारवर काहीसे नाराज दिसत आहे ., त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय  व कांद्याच्या भावा संदर्भात पंतप्रधान या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उद्याला  नरेंद्र मोदी सह उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या देखील नाशिक मध्ये सभा आहे. उद्याला नाशिक जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघेल असे चित्र दिसत आहे. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला

वादळी वाऱ्यामुळे एक अवाढव्य होर्डिंग कोसळल्याने (Ghatkopar Hoarding Collapsd)  आतापर्यंत 14 जणांचा  मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरायला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला.  भरत राठोड असे या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा

घाटकोपरमधील अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग

अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर. सविस्तर वाचा

पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट

मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain)  मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर (Ghatkpor)  इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा 14 वर गेला आहे. तर 75  जण जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा

भाजपला बहुमत मिळणेही अवघड: पृथ्वीराज चव्हाण

देशातील लोकसभा निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. परिणामी केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी वर्तविले. सविस्तर वाचा.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.