Maharashtra Live: सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार : मनोज जरांगे
Maharashtra live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींचे प्रत्येक अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय, राजकीय क्षेत्रातील घडामोडी
LIVE

Background
Maharashtra live blog updates: ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह चिल्यापिल्या सह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल २५ तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली.पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे.रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफ कडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार : मनोज जरांगे
बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
परप्रांतीय व्यक्तीला मारहाणप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : परप्रांतीय व्यक्तीला मारहाणप्रकरणी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चार मराठी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मराठी कुटुंबावर अरेरावी केल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय व्यक्तीला चोप दिला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात हजर करून मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मिळाला आहे.
























