Maharashtra News LIVE Updates : मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 20 ते 25 मिनिटं उशीर झाल्याने नोकरदारवर्गाचे हाल
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लीकवर..
Central Railway : मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत आहे. 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत
- Csmt येथे नवीन सिस्टिम सेट केल्यानंतर आज प्लॅटफॉर्म 5 आणि 7 वर काही टेक्निकल ग्लीच आल्यामुळे लोकलवर परिणाम झाल्याची रेल्वेची माहिती
- एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे कामावर जाण्याची प्रवाशांची घाई त्यात लोकल लेट असल्याने प्रवाशी यांचे हाल
PM Modi : मतमोजणीनंतर पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहे.
- मोदी आणि जे.पी.नड्डा कार्यकर्त्यांना संबोधित करणार
- रात्री उशिरा भाजपसंसदीय बोर्डाचीबैठक
Maharashtra News: मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतना देखील जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा कायम आहे. रविवारी दुपारनंतर ढगाळ वातारण निर्माण झाले होते. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती... निलंगा तालुक्यातील तांबाळा, अहमदपूर तालुक्यातील काळेगाव .. उदगीर तालुक्यातील नावंदी येथे दोन तर सताळा बु. आणि गुडसूर येथे प्रत्येकी एक अशाप्रकारे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विजा कोसळून एकाच दिवसात ७ जनावरे दगावली आहेत. काल जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावली होती.. जोरदार वारे आणि विजयच्या गडगडाचा अनेक ठिकाणी पाऊस बरसला होता.. यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी वीस पडून सात जनावरे दगावली आहेत...
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिच कॅण्डी रुग्णालयात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भेटीसाठी गेले आहेत. शहाजी बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली.
Amol Kolhe : महानिकालाआधीच शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या विजयाचे बॅनर लागलेत..शिरूरचा गड अमोल कोल्हेच राखणार असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. यानंतर आता उद्याच्या निकालापूर्वीच अमोल कोल्हेंना विजयाच्या शुभेच्छा देण्यात येताय.. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा समाना झाला.. दरम्यान इथ दोन्ही पवारांची प्रतिष्ठापणाला लागली असून शिरुरमध्ये बाजी कोण मारणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
Western Railway: पश्चिम रेल्वेवर उपनगरीय रेल्वेसेवा उशिरानं धावत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल असून प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.
- बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून लोकल्स धावणार नाही,पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांची ट्विट करून माहिती
- बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळेवाहतूक विस्कळीत
- बोरिवली स्थानकाजवळतांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bhandara Rain: मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्याचं तापमान प्रचंड वाढलेलं असताना आज हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडाऱ्याच्या मोहाडी आणि तुमसर तालुक्यात मानसून पूर्व पावसानं हजेरी लावली. यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Kolhapur Wather Update: लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पावसाचे सावट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवस यलो अलर्ट आहे. पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : अवघ्या देशाचं लक्ष सध्या एकाच दिवसाकडे लागून राहिलंय. देशाचा आणि राजकारणाच्या पुढच्या पाच वर्षांचा निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात या दिवसाची आतुरेतेने वाट पाहतायत. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) निकालचं थेट प्रक्षेपण आणि निकालाची प्रत्येक अपडेट एबीपी माझावर पाहता येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -