Maharashtra Live Blog Updates: ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर

Maharashtra Breaking News: मुंबईसह राज्यभरातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा.

रोहित धामणस्कर Last Updated: 08 Jun 2024 04:21 PM
मी पळणार नाही, तर लढणार व्यक्ती आहे : देवेंद्र फडणवीस

"देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील भाजपच्या बैठकीत बोलत होते. 

मी पळणार नाही, तर लढणार व्यक्ती आहे : देवेंद्र फडणवीस

"देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील भाजपच्या बैठकीत बोलत होते. 

मोदींच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातून 1 हजार पदाधिकारी दिल्लीला जाणार

भाजपचा महाराष्ट्रातील 1 हजार पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण. भाजपचे सर्व आमदार, खासदार, लोकसभेचे संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक यांना शपथविधीसाठी निमंत्रण. उदया संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार

Sangli News: सांगली शहरात मुसळधार पावसाने चिखल

गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मंसूनपूर्व पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, या पाऊसाने महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे पितळ उघडं पाडलं आहे. शहरात सर्वत्र पाऊसाने तळी साचली आहेत तर उपनगरांमध्ये चिखलाचे साम्राज्य झाले आहे. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक आठ मधील गंगानगर मध्ये ड्रेनेजच्या कामामुळं रस्ता उकरून ठेवला होता. परिणामी पाऊसमुळे सर्व परिसर चिखलमय झाला. गेली 15 दिवस या बाबत अधिकाऱ्यांकडे रस्ता करा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे अधिकारी वर्गाने  पूर्ण पणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून चिखलात बसून आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी त्याठिकाणी पोहोचले मात्र, या अधिकाऱ्यांना देखील नागरिकांनी चिखलात बसवले. नागरिकांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना देखील चिखलात बसावेच लागले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले.

मोठी बातमी: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्र्याचं नाव निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रि‍पदासाठी निवड करण्यात आली. सविस्तर वाचा

Yavatmal News: शेतकरी मशागतीनंतर लागवडीच्या प्रतीक्षेत

ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी आणि वादळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. त्यामुळे जमीन ओलसर असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळवाईची मसागत करण्यास शेतकऱ्यांना सोपे गेले. मशागतीची कामे आटोपली असून काही भागात तर जोरधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अश्या शेतकऱ्यांनि मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली. शेतकऱ्यांनि बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवड्याभरात जोरधार पाऊस झाल्यास शेतकरी लागवडीच्या कामाला लागणार आहे. यावर्षी  जिल्ह्यात खरीप हंगामात 9 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार हेक्टरवर त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार  तर तूर 1 लाख 15 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. 

Solapur News: बार्शीत मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शीमध्ये मराठा समाज पुन्हा आक्रमक. बार्शीतील आनंद काशीद यांचे अर्धनग्न होऊन दंडवत घालत आमरण उपोषणाला सुरुवात. ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. बार्शी तहसील समोर आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात. मराठा समाज आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा  देत बार्शीत हि आमरण उपोषण सुरु

प्रफुल पटेल कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब . देवेंद्र फडणवीस प्रफुल पटेल अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब. उद्या प्रफुल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेणार

Nanded News: नांदेडमधील काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांची अशोक चव्हाणांवर टीका

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले परंतु काही फरक पडला नाही कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आमच्या सोबतच आहेत यामुळेच नांदेडमध्ये आम्हाला मोठी संधी मिळाली. काँग्रेस संपली असं म्हणत असताना काँग्रेसनेच जास्त संख्या घेतली हे आपण पाहत आहात. अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळत आहे अशी चर्चा आहे आता सत्ताधारी पक्षात असल्यामुळे कदाचित मिळू शकेल. अशोक चव्हाण सत्ताधारी पक्ष सोबत गेले हा त्यांचा निर्णय होता त्यांनी जायला पाहिजे नव्हतं मात्र आता त्यांना निर्णय घेतला परंतु काही हरकत नाही जनता आमच्या सोबतच राहील, असे वसंतराव चव्हाण यांनी म्हटले.

ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी हे सर्व उमेदवार आले आहेत. यामध्ये रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते, औरंगाबादचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे रत्नागिरी सिंधुदुर्गचे पराभूत उमेदवार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव  यांचा समावेश आहे. याशिवाय सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले.

ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी हे सर्व उमेदवार आले आहेत. यामध्ये रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते, औरंगाबादचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे रत्नागिरी सिंधुदुर्गचे पराभूत उमेदवार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव  यांचा समावेश आहे. याशिवाय सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले.

Shinde Camp: सहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वेंनी खोडून काढला

लोकसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील सहा आमदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली मात्र शिवसेना शिंदे गटातील एकही आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार नाही. ठाकरे गटातील सहा आमदारांच्या प्रवेशाबाबतचा तो दावा मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी खोडून काढला आहे तो दावा खोडून काढताना अफवा पसरवणाऱ्यांनी एकाही आमदाराचे नाव सांगितल्यास त्याला रोख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटात पुन्हा भूकंप?

ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला. सविस्तर वाचा

Solapur BJP: मोदींच्या शपथविधीपूर्वी सोलापूरात भाजपचा जल्लोष

NDA च्या प्रमुखपदी मोदींची निवड झाल्यानंतर सोलापुरात भाजपचा जल्लोष. सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभेत भाजपचा पराभव झाल्यानंतर हि निराशा झटकून भाजप जल्लोष साजरा करतेय.  सोलापुरातील भाजप कार्यालयाच्या समोर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु. 

PM Modi oath : मोदींच्या शपथविधीला भाजपचे महाराष्ट्रातील सर्व आमदार उपस्थित राहणार

उद्याच्या शपथ विधी सोहळ्याला भाजपचे राज्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत असल्याने राज्यातील भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार

गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारचं षडयंत्र: जरांगे पाटील

जालना: आंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच्याआधारे पोलिसांनी माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली. हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. सविस्तर वाचा

दिल्लीत एनडीएची बैठक

आज राजधानी दिल्लीत अमित शहा यांनी एनडीए घटक पक्षांची बैठक बोलावली आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारनंतर दिल्लीला रवाना होतील. 

सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा

कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

Pankaja Munde: पाथर्डी बंदनंतर, आता शिरुर बंदची हाक; पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मराठवाड्यात तणाव

शिरुर : अहमदनगरच्या (Ahmednagar News) पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) शिरापूर येथील एका युवकानं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून संपूर्ण जिल्ह्यासह बीडमध्येही मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आक्षेपार्ह्य पोस्ट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा

Manoj Jarange Patil: परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम, आता पोलीस काय करणार?

राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. सकाळी दहा वाजल्यपासून ते उपोषणाला बसणार आहेत. सविस्तर वाचा

Nashik Rain: मान्सून जवळ आल्याने शेतीच्या कामाला वेग

मनमाडमध्ये अंतिम मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी वेळेत पाऊस होईल असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा शेतामधील अंतिम मशागतीच्या कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते अगदी काहीच दिवसांमध्ये पाऊस येणार आहे हे लक्षात घेता शेतकरी शेतामध्ये उर्वरित शेवटच्या टप्प्यातील कामे आटोपून घेताना पाहायला मिळत आहेत  सोयाबीन कापूस हळद या पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी शेतामध्ये तयारी करताना पाहायला मिळत आहेत

Jalna Crime: 250 कोटींचे कर्ज देतो म्हणत जालन्यातील व्यापाऱ्याला अडीच कोटींचा गंडा

जालन्यातील सोयाबीन तेल निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याला २५० कोटीचे कर्ज देतो म्हणत एकाने तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घातलाय. उद्योगासाठी अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून हे कर्ज देण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून अडीच कोटी रुपये  व्यापाऱ्याने संशयीत आरोपीला दिले होते. दरम्यान व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या एकाच्या आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकमधून मुसक्या आवळल्या आहे. तर फसवणूक करणाऱ्या सीए, वकील आणि एमडीच्या शोधासाठी आठ जणांची दोन पथके मुंबईकडे रवाना झाली आहेत.

Solapur Crime: सोलापुरात रिक्षात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक

सोलापुरातील बाळे पुलाखाली प्रवाशाला रिक्षामध्ये बसल्यानंतर चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी चाकूचा धाक दाखवत एक लाख सात हजार रुपये लुटले होते.. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 3 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  या प्रकरणातील संशयित रिक्षा घेऊन जुना पुना नाका येथील नाल्याजवळ थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना सापळा रचून पकडले. शिवम चंद्रकांत अलकुंटे, अभिजित रमेश जाधव, अभिषेक नागनाथ अडगळे असे आरोपी तरुणांचे नाव आहेत.  फौजदार चावडी पोलीस ठाण्यच्या डीबी पथकाने ही कामगिरी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभी राहिली नवी ताकद

उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभी राहिली नवी ताकद, मुंबईत मुस्लिम व्होटबँकेकडून भरभरुन मतदान, लोकसभेतील मताधिक्याचे हादरवणारे आकडे! सविस्तर वाचा

BJP: मुंबईत भाजप पक्षाची महत्त्वाची बैठक

 लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात दुपारी एक वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून,  विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. भाजपच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना आज मुंबईत बोलावण्यात आले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन तसेच विधानसभेच्या अनुषंगाने आमदारांना कानमंत्र दिला जाणार आहे.  पक्षांतर्गत अस्वस्थता, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय स्थितीवर फडणवीस भाष्य करण्याची यावेळी शक्यता आहे.

Ramoji Rao: ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; हैदराबादेत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

 नवी दिल्ली : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक (Ramoji Group Founder) रामोजी राव (Ramoji Rao) अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थानं त्रस्त होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांचं निधन झालं आहे. शनिवारी (आज) 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सविस्तर वाच

भंडारा DYSP बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या तरुणीला केली शरीर सुखाची मागणी.  भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर एका तरुणीनं, शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून Dysp बागुल यांच्या विरोधात रात्री उशिरा भंडारा पोलिसात भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Madha Lok Sabha: माढ्यातील पराभवाने शिंदे बंधुंची चिंता वाढली

माढा लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माढा व करमाळा आमदार असलेल्या शिंदे बंधूंची चिंता वाढली , माढा आणि करमाळा येथून तुतारीने घेतले होते मोठे लीड

Parbhani News: मृग नक्षत्रालाच परभणीत जोरदार पावसाची हजेरी

परभणी शहरासह जिल्हाभरात मृग नक्षत्रालाच जोरदार पावसाने हजेरी लावलीय.वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस सर्वत्र बरसलाय परभणी पूर्णा आणि पालम या तीन तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच वादळी वारे सुटल्याने अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी काढलेले भुईमूगही भिजले आहे.दरम्यान अनेक जिल्ह्यात जाणवणाऱ्या उष्णतेपासुन पहिल्याच पावसाने काहीसा दिलासा दिलाय.

Ramoji Rao Passes Away: रामोजी राव यांचं निधन

ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, हैदराबादच्या स्टार रुग्णालयात रामोजी राव यांनी वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात

पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार. सविस्तर वाचा.

Sangli Rain: सांगलीला रात्री तासाभराच्या मुसळधार पावसाने झोडपले

सांगली शहरासह उपनगरांना रात्री दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास तासभर पाऊस चालू होता.यामुळे  शहरातील प्रमुख चौकात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. स्टॅंड जवळील झुलेलाल चौक, मारुती चौक आणि भाजी मंडई रोडवर तर गुडघाभर पाणी साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते.स्टेशन चौक, राममंदिर चौक, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. यामुळे नागरिकांची हाल झाले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना मान्सून पावसाची चाहूल लागली असून शेतीच्या कामांना गती  मिळणार आहे. तासगाव-मिरज पुर्व भागासह शिराळा-वाळवा तालुक्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.

Nashik News: सटाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील करंजाड परिसरात काल वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली..सुमारे ४० मिनिटे सुरु असलेल्या पावसाने सकल भागात पाणी साचले होते..मात्र वादळी वाऱ्याने घरांच्या छतावरील पत्रे उडाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले..तर परिसरात अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..

मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी

मान्सून तळकोकणात दाखल होऊन अनेक तास उलटून गेले आहेत. मुंबईत आता कोणत्याही क्षणी नैऋत्य मोसमी वारे प्रवेश करु शकतात. मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाचा अंदाज

बंडू जाधव मनोज जरांगेंच्या भेटीला

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्यानंतर परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी रात्री उशिरा  मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे यांनी बंडू जाधव यांचा सत्कारही केला. रात्री उशिरा अंतरवली सराटी गावात ही भेट झाली.

पालघरमध्ये पावसाला सुरुवात

पालघरच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात. गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण असणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा. पहाटेपासूनच पालघर मनोर डहाणू वाडा विक्रमगड भागात पावसाची रिपरिप सुरू

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मदना, थुगाव, खैरगाव या परिसर झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरावरच्या पत्रे उडाले, झाडे कोसळली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: मुंबईसह राज्यभरातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्र आणि देशपातळीवरील राजकारणामध्ये काय घडत आहे? राज्यात मान्सूनची स्थिती काय, कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस, सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेटस्.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.