Latur News : पाटबंधारे विभागाने थकबाकी वसूलीसाठी कडक मोहीम राबवली आहे. लातूर एमआईडीसीची 2012 पासुनची थकबाकी आहे. 5 कोटींपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी कारवाई करण्यात येत आहे. यातून लातूर एमआईडीसी भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. काल दुपारनंतर हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे या भागातील 700 पेक्षा जास्त उद्योगाला याचा फटका बसला आहे.
पाणीपुरवठा बंद, 700 पेक्षा अधिक उद्योगावर परिणाम
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी मालावर आधारित उद्योग असणारी लातूर एमआईडीसी आहे. येथे अनेक कारखाने आहेत. सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग देशात नावाजलेले आहेत. यासह अनेक शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. पाणीपुरवठा बंद करण्याच्या निर्णयामुळे त्यांना फटका बसला आहे. लातूर एमआईडीसी भागात सी आर पी एफ सेंटर आहे. यात 2000 पेक्षा अधिक जवान आहेत. समाज कल्याण विभागाचे वसतिगृह इथेच आहे. या ठिकाणी 1500 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्यांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. 24 तासापेक्षा अधिक काळ पाणी बंद राहिले, तर प्रश्न गंभीर बनू शकतो.
थकबाकीच्या वसुलीसाठी तगादा
लातूर एमआईडीसी, अतिरिक्त एमआईडीसी आणि औसा एमआईडीसी या भागात मांजरा धरणामधून पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र पाटबंधारे विभागाने 2012 पासुनच्या थकबाकीच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. पाच कोटीपेक्षा अधिकची वसुली बाकी आहे. मात्र एमआईडीसी प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे की, आम्ही दर महिन्याचे पानी पुरवठयाची देयक भरली आहेत. ही वसूली भरण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत. बाष्पिभवन झालेल्या पाण्याची वसुली आमच्याकडे करण्यात येत आहे. जे योग्य नाही. पाटबंधारे विभागाने एमआईडीसी बरोबर असा पत्र व्यवहार केला आहे. मात्र लातूर इथेच वसुलीसाठी कड़क पावले उचलत पाणीपुरवठा बंद केला आहे. या तीन भागातील पानी पुरवठा बंद केल्याने अनेक उद्योगावर त्याचा परिणाम होत आहे. अशी माहिती एमआईडीसी चे कार्यकारी अभियंता संजय कौसडीकर यानी दिली आहे. 2012 साल पासुनची ही थकबाकी आहे. यात बाष्पिभवन झालेल्या पाण्याची बाकी आहे. वेळोवेळी याबाबत लातूर एमआईडीसी कार्यलयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ते या बाबत गंभीर नाहीत. यामुळे काल दुपारनंतर पाणीपुरवठा बंद केला आहे. अशी माहिती प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live