Satara News : रस्त्यावर झोपलेल्या अवघ्या चार वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकरणातील आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 21 मार्चच्या रात्री सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फोडजाई मंदिराच्या परिसरामध्ये एक गरीब कुटुंब रस्त्यावर झोपलेले होते. रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात आरोपीने त्या ठिकाणी येऊन झोपलेला कुटुंबातील चार वर्षाची मुलगी उचलून नेली होती. या चार वर्षाच्या मुलीला एका महाविद्यालयाच्या परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तेथेच सोडून दिले होते. 

Continues below advertisement


रक्तबंबाळ अवस्थेत सापडली


गंभीर जखमी झालेली चार वर्षाची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांकडून शोध घेण्याचं काम सुरू असतानाच संबंधित मुलगीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला पुण्यातील खाजगी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा आणि त्याला बेड्या ठोकाव्यात या कारणासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर आग्रह धरला होता. दरम्यान याबाबत त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोरच राडा केला. 


जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
एवढेच नव्हे तर मुलीच्या कुटुंबातील एकाने विषारी पावडर खाऊन आत्महत्या ही करण्याचा प्रयत्न केला.  त्याच्यावरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि पोलिसांना महत्त्वाचा धागादोरा लागला असून त्या आरोपीला पोलिसांनी आता बेड्या फक्त ठोकल्या आहेत. पोलिसांनी सध्या आरोपीचे नाव गोपनीय ठेवले आहे.


संबंधित बातम्या


Pune Crime : पुणे जिल्ह्यात इन्स्टाग्रामवरुन हत्यारं मागवली; गृहराज्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण 


Pune Crime : गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार


Crime News : आईने शिकवलं 'गुड टच, बॅड टच'; 9 वर्षाच्या मुलीने बलात्कारी शिक्षकाचे फोडले बिंग


Pune Crime : पुण्यात 20 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या