Maharashtra News LIVE Updates : अमरावतीत संजय राऊत यांचा युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांकडून प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2024 02:17 PM
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा, स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार सभा..

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात 29 एप्रिलला सभा..


स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार सभा..


पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा..

Amravati : अमरावतीत संजय राऊत यांचा युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांकडून प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

Amravati : अमरावतीत संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध


युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांकडून निषेध


इर्विन चौकात संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देत संजय राऊत यांचे दोन पुतळे जाळण्यात आले यात एका पुतळ्याला बांगड्या घालण्यात आल्या आले होते


काल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.. त्याचा निषेध म्हणून युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती शहरातील इर्विन चौकात संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला...

Ramdas Kadam : कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही - रामदास कदम

Ramdas Kadam : कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू - रामदास कदम


सध्या दुधाची तहान ताकावर भागवतोय - रामदास कदम


नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न...


आम्हाला नारायण राणे नाही,तर नरेंद्र मोदी महत्त्वाचे - रामदास कदम


विधानसभेत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल - रामदास कदम

Dhule : धुळ्यात काँग्रेसच्या नाराज जिल्हाध्यक्षांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीकडे फिरवली पाठ

Dhule : काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष शामकांत सणेर यांनी आज महाविकास आघाडीच्या धुळ्यात सुरू असलेल्या बैठकीकडे फिरवली पाठ


काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते शामसनेर परंतु उमेदवारी डावलल्याने श्याम सनेर आहेत नाराज


महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बॅनर वर देखील शामसनेर यांचा डावलण्यात आला फोटो


काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य अद्यापही सुरूच


जिल्हा बाहेरील उमेदवार दिल्यामुळे श्यामकांत सनेर आहेत नाराज....

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची महत्त्वाचे विषयावर तीन वाजता पत्रकार परिषद 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची महत्त्वाचे विषयावर तीन वाजता पत्रकार परिषद 


मुंबईतल्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद 


नाशिक लोकसभेच्या अनुषंगाने छगन भुजबळ इच्छुक मात्र नाशिक लोकसभेचा अद्याप निर्णय झालेला नाही 


आजच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष 


नाशिक लोकसभेवरचा दावा आम्ही सोडला नसल्याची नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया


दुपारी तीन वाजता छगन भुजबळ यांची प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद

Sunil Tatkare : रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची अर्ज भरला - योगेश कदम

Sunil Tatkare : रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची अर्ज भरला - योगेश कदम


सुनील तटकरे यांना दापोलिमधून सर्वाधिक मताधिक्य देणार. - योगेश कदम


महायुतीची वज्रमूठ भक्कम झाली आहे, ती कोणीही तोडू शकत नाही - योगेश कदम


शिवसैनिक म्हणून सिंधुदुर्गची जागा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती - योगेश कदम



येणाऱ्या सर्व निवणुका महायुती म्हणून लढणार - योगेश कदम


सर्व घटक पक्षांशी चांगला समन्वय....महायुतीची वज्रमूठ कोणीही भेदू शकत नाही - योगेश कदम


मनसे मध्ये कोणाचीही नाराजी नाही, मनसेचे नेते फॉर्म भरताना उपस्थित होते - योगेश कदम यांची वैभव खेडेकर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया.

Sangali : सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते एकवटले

Sangali : सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते एकवटले, ट्रॅक्टर , बैलगाड्या रॅलीत मध्ये असणार



 सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील थोड्याच वेळात सांगलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आहेत. यासाठी सांगलीच्या स्टेशन चौकात चंद्रहार समर्थक तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. स्टेशन चौक पासून भव्य अशी रॅली काढत चंद्राहार पाटील हे आज आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत. स्टेशन चौक ते मारुती चौक या मार्गावर  रॅली काढण्यात येणार आहे. मारुती चौकातील मारुतीरायाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे दर्शन रॅली नंतर घेणार आहेत..मारुती चौकात या सर्व नेत्याची छोटेखानी सभा पार पडणार आहे.

Ajit Pawar : धाराशिवमध्ये अजित पवार यांच्या रॅलीला सुरूवात 

Ajit Pawar : धाराशिवमध्ये अजित पवार यांच्या रॅलीला सुरूवात 


जिजाऊ चौकातून सुरुवात 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून 


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांची सभा

Solapur : माढा लोकसभेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी महात्मा फुलेच्या वेशात आले उमेदवार

Solapur : माढा लोकसभेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी महात्मा फुलेच्या वेशात आले उमेदवार


मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी महात्मा फुले यांची प्रतिकात्मक वेशभूषा  


महात्मा फुलेंचा वेश परिधान करून हातात संविधान घेऊन हाके पोहोचले जिल्हाधिकार्यालयात 


माढा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी व्हिजेएनटी  समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी लक्ष्मण हाके यांनी दाखल केला अर्ज..


माढा लोकसभेसाठी  नेत्यांच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज 

Sanjay Jagtap : माझा पराभव झाल्यावर मी अमेरिकेत गेलो होतो - संजय जगताप

Sanjay Jagtap : माझा पराभव झाल्यावर मी अमेरिकेत गेलो होतो - संजय जगताप


अमेरिकेतील लोकांनी सांगितले की तुम्ही पुण्यातील आहात तिथले शिवाजी महाराज आहेत आणि शरद पवार आहेत


परत यांची सत्ता आली तर आपला मतदानाचा अधिकार जाणार आहे..पुढची निवडणूक होणार नाही

सांगली : 'स्वाभिमानी'चे महेश खराडे उमेदवारी अर्ज दाखल करणार 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 12 वाजण्याच्या सुमारास हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी  सांगलीत उपस्थित राहणार आहेत.

Pune : पुण्यात डी एस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे, ईडीची दोन पथकं कार्यालयात पोहोचली

Pune : पुण्यात डी एस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे 


जंगली महाराज रोडवरील कार्यालयावर ईडीचे छापे


गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई


ईडीची दोन पथक डीएसके च्या कार्यालयात पोहोचली आहेत

 Sangli : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेत मनोमिलन?

Sangli : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेत मनोमिलन?


संजय राऊत यांचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी हॉटेल मध्ये भेट घेत केले स्वागत


शिवसेनेचे  उपनेते नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते आणि कॉंग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्यात  चर्चा 


चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी  कॉंग्रेसचे  जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत   उपस्थित राहणार

Bhiwandi : भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात, दोन सख्खे भाऊ कारच्या धडकेत जागीच ठार

Bhiwandi : भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात दोन सख्खे भाऊ कार च्या धडकेत जागीच ठार
       


भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


मृत पावलेले दोन्ही इसम चिंचवली खांडपा या गावचे रहिवासी आहेत.


पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील असे मयत इसमांची नावे आहेत.


भिवंडीहुन अंबाडी कडे भरधाव वेगाने येणारी वॅगनार कार MH 04KW1746 दुगाड फाटा येथे येते


कार ने अगोदर एका महिलेला जोरदार धडक दिली,


त्या भीतीने सदर कारच्या ड्रायव्हर ने आपली कार भरधाव वेगाने अंबाडी च्या दिशेने नेत असताना वारेट गावच्या हद्दीत  कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या  भावांना भरधाव वेगात धडक दिली ही  धडक एवढी भीषण होती की हे दोघेही भाऊ जागीच ठार झाले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Sangli : संजय राऊत आज सांगलीत, आमदार विक्रम सावंत राऊतांना भेटण्यासाठी हॉटेलवर दाखल

Sangli : संजय राऊत सांगली शहरातील हॉटेल मध्ये पोचले


कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत संजय राऊत यांना भेटण्यासाठी हॉटेल वर दाखल


चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी  कॉंग्रेसचे काही नेते  उपस्थित राहण्याची शक्यता

Praniti Shinde : आमदार प्रणिती शिंदेंच्या नावे साडेसहा कोटींची मालमत्ता, पाच वर्षांत मालमत्तेत 1.81 कोटींची वाढ

आमदार प्रणिती शिंदेंच्या नावे साडेसहा कोटींची मालमत्ता


पाच वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ;


मात्र  दागिने, जमीन, जागांमध्ये कोणतीही वाढनाही 


सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.


त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे.


२०१९च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी ८१ लाख ४२ हजार १९२ रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत  आहे.

Vasantrao Chavan : जरांगे पाटील यांनी सांगितले भाजप सोडून मतदान करा - वसंतराव चव्हाण

Vasantrao Chavan : जरांगे पाटील यांनी सांगितले भाजप सोडून मतदान करा - वसंतराव चव्हाण


मुदखेड तालुक्यातील निवघा येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली


त्या सभे मधील वसंतराव चव्हाण यांचे भाषण हे चांगले चर्चेत आले आहे


मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे सरकारच्या विरोधात व भाजप सोडून मतदान करा


जरांगे माझ्या गावी आले होते  त्यावेळी आपण देखील समजासाठी हातभार लावला असे चव्हाण यांनी सांगितले

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर, भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार..

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार..


.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या राहाता शहरात आज महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन....



आदित्य ठाकरेंसह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख राहणार उपस्थित...



आज दुपारी 12 वाजता करणार उमेदवारी अर्ज दाखल...



राहाता शहरात आदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि त्यानंतर प्रचार सभेचे देखील आयोजन...

Political : दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

Political : दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट


महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यांनतर शेवाळे पहिल्यांदाच घेणार राज ठाकरेंचं भेट 


राहुल शेवाळे सदिच्छा भेट घेत असले तरी या भेटीमध्ये प्रचाराबाबत चर्चा होऊ शकते 


दक्षिण मध्य मुंबईतून मदत आणि पाठिंबा मिळण्याबाबत राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते

Political : दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

Political : दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट


महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यांनतर शेवाळे पहिल्यांदाच घेणार राज ठाकरेंचं भेट 


राहुल शेवाळे सदिच्छा भेट घेत असले तरी या भेटीमध्ये प्रचाराबाबत चर्चा होऊ शकते 


दक्षिण मध्य मुंबईतून मदत आणि पाठिंबा मिळण्याबाबत राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते

Chandrashekhar Bawankule : शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांवर हल्लाबोल


घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?


राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, याची आधी माहिती घ्यावी


राम मंदिरप्रश्नी चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांना सल्ला

Salman Khan : अभिनेता सलमान खानला लॉरेंस बिश्नोई चा नावाने पुन्हा धमकी

Salman Khan : अभिनेता सलमान खानला लॉरेंस बिश्नोई चा नावाने पुन्हा धमकी,,,


परवा सकाळी लॉरेंस बिश्नोई च्या नावाने ओला कार बुक करून गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ पाठवली,


ओला चालकांनी गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ गाडी थांबून लॉरेंस बिश्नोई चा नावाने कार बुक आहे त्यांना पाठवा असा सिक्युरिटी ला बोलला,


लॉरेंस बिश्नोई चा नावाने ओला सलमान खान यांच्या घरा पासून ते बांद्रा पोलीस स्टेशन साठी बुक करण्यात आली होती.


सलमान खानच्या सिक्युरिटीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर बांद्रा पोलिसांनी ओला कार  चालका कडून माहिती घेतली.


यानंतर बांद्रा पोलिसांनी ओला कार बुक करणारा आरोपीला गाजियाबाद मधून अटक केली आहे.


लॉरेंस बिश्नोई चा नावाने कार बुक करणारा आरोपी चा नाव रोहित त्यागी वय 20 वर्ष असून त्याच्याकडून बांद्रा पोलीस अधिक तपास करत आहेत...

Dharashiv : धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार 

Dharashiv : काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील मालक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार 


अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असणार उपस्थितीत 


2 दिवसा पुर्वी मधुकरराव चव्हाण यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यावेळी बसवराज पाटील होत्र उपस्थितीत 


मधुकर चव्हाण काँग्रेस पक्षात राहणार तर मुलगा सुनील करणार भाजपत प्रवेश


मधुकर चव्हाण तुळजापूर येथील माजी आमदार, आमदार राणा पाटील यांचा तुळजापूर विधानसभा मतदार संघ

Solapur : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली मोहोळचे आमदार राजन पाटील यांची भेट 

Solapur : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली मोहोळचे आमदार राजन पाटील यांची भेट 


राजन पाटील यांच्या अनगर मधील 'मातोश्री' निवासस्थानी झाली भेट 


मोहिते - पाटील आणि राजन पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना आले उधान 


विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात 


मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हॆ मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात


त्यामुळे महायुतीचे सोलापूरचे  उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत राजन पाटील होते अग्रभागी


मात्र अचानकपणे एकेकाळचे सहकारी आणि सध्या विरोधी गटात असणाऱ्यांची भेट झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु

Pune : पुण्यात येरवडा परिसरात पुन्हा गोळीबार, एकमेकांचे नातेवाईक, जुना भांडणाचा वाद,

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबार


जुन्या वादातून सलग चौथ्या दिवशी पुण्यात गोळीबार


पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा दोघांवर करण्यात आला गोळीबार


जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर झाडण्यात आल्या तीन गोळ्या


आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबर


गोळीबार करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी  घेतलं ताब्यात


पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील  अग्रेसन स्कूल समोर घडला प्रकार


 जुना भांडणाचा वाद होता दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती

Weather Update : राज्यातील वातावरणात सतत बदल, देशातील काही भागात अवकाळी पावसासह हिमवृष्टीचा इशारा

Weather Update : राज्यातील वातावरणात सतत बदल होतोय. 


कुठं उन्हाचा तडाखा, तर कुठं अवकाळी पाऊस कोसळत आहे. 


हवामान विभागाच्या माहितीनुसार आजही देशातील काही भागात अवकाळी पावसासह हिमवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 


तर दिल्लीतील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 


21 एप्रिलपर्यंत देशातील झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता 


जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. 


हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी 


पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 


राजस्थानमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

भिवंडीत निवडणूक लढवण्याबाबत  एम आय एम पक्षाकडून अजून ही निर्णय नाही - वारीस पठाण

Bhiwandi : भिवंडीत निवडणूक लढवण्या बाबत  एम आय एम पक्षा कडून अजून ही निर्णय नाही - वारीस पठाण


भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार असल्याने या निवडणुकीत एम आय एम पक्ष आपला उमेदवार उभा करणार अशी चर्चा मागील काही दिवसां पासून सुरू असताना, भिवंडी शहरात आज पक्षातर्फे आयोजित ईद ए मिलाद कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माजी आमदार वारिस पठाण यांनी पक्ष भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत  विचार करत असल्याचे सांगत निवडणुकीस अजून वेळ आहे असे सांगून अनिश्चितता व्यक्त केली आहे

Lok Sabha Election 2024 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून तब्बल ४ हजार २५५ गुन्हे दाखल केले

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीत मतदारांना दारूची प्रलोभन दाखवली जातात किंवा पार्ट्यांचे आयोजन केले जाते


त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे


राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचार संहिता लागू झाल्यापासून तब्बल 4 हजार 255 गुन्हे दाखल केले आहेत


तर या गुन्ह्यात 3 हजार 754 आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे


तर या सर्व कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर महत्त्वाची अपडेट, फेसबुक खाते उघडण्यासाठी परदेशातील मोबाइल क्रमांकाचा वापर


Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या  गोळीबारानंतर त्याची जबाबदारी अनमोल बिष्णोई याने फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करत स्विकारली   



मात्र हेच फेसबुक अकऊन्ट ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी ते उघडण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे


 तसेच अनमोल बिष्णोई नावाचे हे फेसबुक खाते उघडण्यासाठी परदेशातील मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.


या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 15 ते 16 जणांचे जबाब नोंदवले आहेत



या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची पथक बिहारलाही जाणार आहे.

Thane  : ठाण्यातील कोपरी येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रौत्सवाची आज सांगता

Thane  : ठाण्यातील कोपरी येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रौत्सवाची आज सांगता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करून विसर्जन मिरवणूक


या मिरवणुकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , माजी आमदार रविंद्र फाटक, प्रवक्ते नरेश म्हस्के हे एकाच बोटीत सहभागी झाले होते,


मनोभावाने पूजा अर्चना करून  मासुंदा तलावात देवीचे विसर्जन करण्यात आलं.

Pandharpur : चैत्री कामदा एकादशी निमित्त पहाटे विठुरायाची नित्यापुजा संपन्न, दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल

Pandharpur : चैत्री एकादशी निमित्त पहाटे विठुरायाचे नित्यापुजा संपन्न


आज चैत्री अर्थात कामदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते देवाची नीत्यापुजा संपन्न झाली.


चैत्री यात्रा ही वारकरी संप्रदायातील प्रमुख चार यात्रांपैकी असून यावर्षी यात्रेला दुष्काळाचा फटका बसला आहे.



आज चैत्री यात्रेसाठी दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.


वाढलेले तापमान, दुष्काळाची परिस्थिती आणि भीषण पाणी टंचाई याचा फटका यावेळी चैत्री यात्रेला बसला आहे.


यातच मंदिर संवर्धनाचे काम सुरू असल्याने यात्रेतील भाविकांना देवाचा दुरून दर्शन घ्यावे लागत आहे.


सध्या दर्शन रांग पहिल्या पत्राशेड मध्ये पोचली असून दर्शनाला 4 ते 5 तास एवढा वेळ लागत आहे.

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजता पासून मतदानाला सुरुवात


प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे.


आर्णी येथील युवा आदर्श मतदान केंद्र मतदानासाठी सजविण्यात आले आहे.


चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात यवतमाळच्या आर्णी आणि वणी या दोन मतदार संघाचा समावेश आहे.


निवडणूक विभागाकडून मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल करण्यात येत आहे.

Sindhudurg : आज नारायण राणे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार.

Sindhudurg : आज सकाळी 11 वाजता शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे उमेदवारी अर्ज भरणार.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, निलेश राणे राहणार उपस्थित.


दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.