Maharashtra News LIVE Updates : वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय, अमित ठाकरेंचा टोला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अमित ठाकरे
वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे असे मत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी/ उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही
त्यांच्या विरोधात वातावरण आहे. अमोल किर्तीकर यांचा खिचडी घोटाळा समोर आलाय
देशात पुन्हा मोदी सरकार येणार. 300 च्या आसपास जागा मिळतील
राज साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार
लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा आज जुन्नर विधानसभा मतदारसंघात दौरा असून प्रचारा दरम्यान पिंपळगाव येथे रामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमाला दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावर आले. ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहणेही टाळले आणि कार्यक्रम उरकून पुढील प्रचारासाठी निघून गेले.
परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीत सभा होणार आहे.शहरातील पाथरी रोड लगत असलेल्या लक्ष्मी नगरी येथे पंतप्रधान मोदींची सभा नियोजित आहे.आज रामनवमी निमित्त या सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासहित महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्यात मनसेनं पाठिंबा दिला त्याबद्दल भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मानले आभार
मनसेचे एकावेळी पुण्यात 29 नगरसेवक असताना होते,त्यामुळे मनसेची संपूर्ण शहरात चांगली ताकद आहे.त्याचा फायदा होणार आहे.
एमआयएम ने उमेदवार दिला त्याचा तो निर्णय आहे
राज ठाकरे यांच्या बॅनरवर फोटो लावण्यात येईल काही ठिकाणी दिसत नव्हता.
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले. ही राजकीय नव्हे तर खासगी भेट असल्याची माहिती. मात्र निवडणुकीच्या पूर्वी अशी भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले. ही राजकीय नव्हे तर खासगी भेट असल्याची माहिती. मात्र निवडणुकीच्या पूर्वी अशी भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले. ही राजकीय नव्हे तर खासगी भेट असल्याची माहिती. मात्र निवडणुकीच्या पूर्वी अशी भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.
भाजप नेते निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका
काल फॉर्म भरताना राऊतांना मविआच्या जेमतेम १२०० लोकांचेच समर्थन
राऊतांना १२०० लोक जमवणे म्हणजे शिवाजी पार्क भरल्यासारखे
विनायक राऊतांना निलेश राणेंचा खोचक टोला
कमी कार्यकर्त्यांमुळे राऊतांनी छोट्या हॉलमध्ये कार्यक्रम संपवला
बारामतीत सुनेत्रा पवारांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे
बारामती- प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रचारप्रमुखाची नियुक्ती केली जाणार असून बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी बाळासाहेब तावरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ठाण्याची उमेदवारी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना मिळणार का?
ठाण्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र वायरल झाले आहे, ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचे स्वतः सरनाईक यांनी म्हटले आहे,
नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या क्षेत्रात असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे,
हे पत्र 29 मार्चचे आहे, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, मात्र ठाण्याची जागा सेनेला सुटली असल्याची चर्चा आहे, तर रत्नागिरीचा जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा आहे,
त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा सुटला का हा प्रश्न आहे,
माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.
एकनाथ खडसे यांना धमकीचे चार ते पाच फोन
विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती
नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
धमकीच कारण अद्याप अस्पष्ट
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे आत्मपरीक्षण करावे असे म्हणत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करणार असल्याचे बिचुकलेंनी सांगितलं.
संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार विनोद पाटील यांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात उतरली आहे..भाजपच्या नगरसेवकांनी काल रात्री एक बैठकही घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत विनोद पाटील यांना तिकीट द्यावे अशा पद्धतीची मागणी केली आहे.त्यामुळे शिवसेनेकडून इतर इच्छुक उमेदवार यांना भाजता नगरसेवकांचा विरोध आहेत हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. सुरुवातीला ही सीट भाजपाला सुटावी अशी इच्छा होती मात्र आता भाजपाला सुटताना दिसत नाही तर किमान प्रबळ उमेदवार मिळावा अशी इच्छा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.. आणि त्यासाठी विनोद पाटील हे प्रबळ उमेदवार असल्यास या सगळ्यांचे एक मत आहे आणि त्यासाठी त्यांनी आज त्यांनी भाजप विशिष्ट नेत्यांची भेटही घेतली.
अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. या पहिल्या रामनमवीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्तं दर्शनासाठी दाखल झालेत. अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी फुलून गेलेत. अयोध्येतील ही संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहने थांबवून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शनासाठी जावं लागत आहे. तसेच भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. आज राम नमवीच्या दिवशी २५ लाखाहून अधीक भावीक राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -