Stock Market : तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 299 टक्के परतावा दिला आहे.
फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्स
1/6
भारतीय शेअर बाजारात फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुमचा स्टॉक आयपीओद्वारे भारतीय शेअर बाजारात दाखल झाला होता. या आयपीओवर पैसे लावणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
2/6
कंपनीनं आयपीओ आणताना 85 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्सचा शेअर 28 मार्च 2025 ला 339 रुपयांवर होता.
3/6
फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्स लिमिटेडचा आयपीओ लिस्ट होताना 90 टक्के नफ्यासह 161.50 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशीच शेअर 169.57 रुपयांवर पोहोचलेला. पहिल्याच दिवशी शेअरमध्ये 99 टक्के तेजी दिसून आली.
4/6
फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्स लिमिटेडचा आयपीओ लिस्ट होताना 90 टक्के नफ्यासह 161.50 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशीच शेअर 169.57 रुपयांवर पोहोचलेला. पहिल्याच दिवशी शेअरमध्ये 99 टक्के तेजी दिसून आली.
5/6
फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्सचा आयपीओ तब्बल 740.37 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा 715.05 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर होते.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 31 Mar 2025 06:09 PM (IST)