Maharashtra Kesari Kusti Competition : कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर गाडा रुळावर यायला लागलाय. अशातच आजपासून साताऱ्यामध्ये 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेला सुरुवात होणार आहे.  दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्यानं यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरणार आहेत. अशातच मानाची गदा कोण पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 


पाहा व्हिडीओ : कुस्तीत महाराष्ट्राचं मोठं यश, महाराष्ट्राच्या अंडर-15 पैलवानांनी गाजवली स्पर्धा



महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबासाठीच्या 64व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं 4 ते 9 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल. कोरोनाच्या संकटात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या पैलवानांना महाराष्ट्र केसरी कुस्तीची यंदा मोठी प्रतीक्षा होती. 


दरम्यान, यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली होती. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :