IPL 2022: नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या बाराव्या सामन्यात लखनौच्या संघानं हैदराबादला 12 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हदराबादच्या संघानं लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखौनच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघ केवळ 157 पर्यंत मजल मारू शकला. लखनौकडून आवेश खाननं उत्कृष्ट गोलंदाजी केली. 


नाणेफेक गमवाल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक एक धाव करून बाद झाला. त्यानंतर एविन लुईसही स्वस्तात माघारी परतला. मात्र, कर्णधार केएल राहुलनं एक बाजूनं संघाचा डाव सावरला. मनिष पाडे आणि आयुष बदोनी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. परंतु, दोघेही अपयशी ठरले. हे दोघे बाद झाल्यानंतर दिपक हुड्डा आणि केएल राहुलनं संघाचा डाव पुढे नेला. मात्र, पंधराव्या षटकातील पहिल्याच चेंडूमध्ये शेफर्डनं हुड्डाला माघारी धाडलं. त्यानंतर 18 व्या षटकात केएल राहुलनं आपली विकेट्स गमावली. त्यानं 50 चेंडूत 68 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्यामुळं लखनौच्या संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावापर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, शेफर्ड आणि टी नटराजन यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाली. 


लखनौच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामी देण्यासाठी अभिषेक शर्मासोबत मैदानात आलेल्या कर्णधार केन विल्यमसन स्वस्तात माघारी परतला. त्यानं 16 चेंडूत 16 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाटी आलेल्या राहुल त्रिपाठीनं उत्कृष्ट फलंदाजी करत 30 चेंडूत 44 धावा केल्या. परंतु, क्रुणाल पांड्यानं तेराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याला झेलबाद करून माघारी धाडलं. निकोलस पूरनलाही या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. तोही 24 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला 20 चा आकडा गाठता आला नाही. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना लखनौकडून गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जेसन होल्डरनं तीन विकेट्स घेऊन सामना फिरवला. लखनौकडून आवेश खाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha