IPL 2022: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये पंजाबनं 54 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोनने चेन्नईच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावली. आधी जोरदार फलंदाजी करुन 32 चेंडूत 60 धावांची तुफान खेळी खेळली.  त्यानंतर त्यानं 2 विकेट्सही घेतल्या. या सामन्यात लिव्हिंगस्टोननं हवेत उडी मारत ब्राव्होचा झेल घेतला. लिविंगस्टोनने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर ब्राव्हो ऑफ साईडच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि चेंडू हवेत उडाला. त्यानंतर लिव्हिंगस्टोननं डावीकडे खूप लांब उडी मारून झेल घेतला. हे पाहून मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू आणि चाहते आश्चर्यचकित झाले. हा झेल पाहून ब्राव्होही आश्चर्यचकित झाला. विकेट गमावल्यानंतर तो खूपच निराश दिसत होता. या कॅचचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्कृष्ठ फलंदाजीनंतर, लिव्हिंगस्टोननं चांगली गोलंदाजी करत प्रसिद्धी मिळवली आहे. 


मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.


हे देखील वाचा-  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha