Maharashtra Kesari Kusti Competition 2022 : महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राच्या मातीतील मानाच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं (Prithviraj Patil) विजय मिळवत मानाची गदा पटकावली. जवळपास 21 वर्षानंतर ही गदा कोल्हापूरला मिळाली. पण ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी खंत पृथ्वीराजनं नुकतीच सोशल मीडियावर व्यक्त केली होती. या पोस्टच्या व्हायरल होण्यानंतर काही तासांतच भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून लाखो रुपये बक्षीस स्वरुपात पृथ्वीराजला देण्यात आले आहेत.


महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मारलेल्या पैलवान पृथ्वीराज पाटील याला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून ही माहिती त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. तसेच शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटील याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि तालीम संघ यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मारलेले कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील याला फक्त चांदीची गदा दिली आहे. मात्र रोख रक्कम न दिल्यामुळे त्याने सोशल मीडियावरती आपली खंत व्यक्त केली होती. त्यानंतर त्याला शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराजे देसाई यांच्या कडून अशा पद्धतीने मदत जाहीर करण्यात आली आहे.


कोण आहे पृथ्वीराज पाटील?


आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत. दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्याने 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha