Sangli: हरिपूरमध्ये पती-पत्नीवर जीवघेणा हल्ल्याची घटना घडलीय.  या हल्ल्यात पतीचा मृत्यू झालाय तर, पत्नी गंभीर जखमी झालीय. ही घटना हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमध्ये सोमवारी (21 मार्च) रात्रीच्या सुमारासची घटना घडली. हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या शोधात आहे. या घटनेनंतर परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झालंय.


 सुरेश नांद्रेकर (वय 47) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुरेश हे आरटीओ एजंट म्हणून काम करायचे. दरम्यान, सोमवारी सुरेश 'नांद्रेकर आणि त्याच्या पत्नी संकष्टी सोडण्यापुर्वी बागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. दर्शन घेवून घरी परत येत असताना त्यांच्या घराच्या 50 फुटाच्या अलिकडेच तिघे हल्लेखोर दबा धरून बसले होते. 


या तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं सुरेश यांच्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात सुरेश गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर हे तिघे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ सुरेश आणि त्यांच्या पत्नीला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, आज पहाटे सुरेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha