मुंबई : अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता.

यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास बराच उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकालाला बराच विलंब झाला.

विभागनिहाय निकाल
कोकण - 95.89
पुणे - 92.50
कोल्हापूर -92.42
अमरावती - 92.09
नागपूर - 91.65
लातूर - 89.79
मुंबई - 89.35
नाशिक - 88.87
औरंगाबाद - 88.18

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह आणखी काही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी, निकालासंदर्भात आठ महत्वाच्या गोष्टी


परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांची नोंदणी

बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI