बुलडाणा : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. मात्र बुलडाण्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याचं समोर आलं आहे. शेगाव येथील साईबाई मोटे शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. प्रसुतीनंतर कोरोनाबाधित महिलेला सामान्य रुग्णांच्या कक्षात ठेवलं होतं.


बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील अश्विनी धर्मे ही महिला 15 फेब्रुवारीला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसूतिसाठी दाखल झाली होती. 16 तारखेला सदर महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वेब घेण्यात आला. तर 16 तारखेलाच या महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यानंतर या महिलेला सामान्य रुग्णांच्या वार्डमध्ये उपचार करण्यास दाखल करण्यात आलं. त्यानंतर अश्विनी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 19 फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला.


Mumbai Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर, कारवाईचा धडाका, हजारांहून अधिक इमारती सील


कोरोनापॉझिटिव्ह असताना देखील दुसऱ्याच दिवशी या महिलेला रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर ही महिला आपल्या गावी निघून गेली. मात्र हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांची घाबरगुंडी उडाली. लगेच फोनद्वारे या महिलेच्या पतीला माहिती देण्यात आली. तो पर्यंत या महिलेच्या संपर्कत 200 ते 250 महिला नातेवाईक आले होते. आता आरोग्य प्रशासन या महिलेच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब चाचणीसाठी घेत आहे.


CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई


मात्र प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नातेवाईकही चिंतीत झाले आहे. या नातेवाईकांनी आरोग्य अधिकाऱ्यांशीही वाद घातला. साईबाई मोटे रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आता मोठा कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु केल्याने कोरोना रुग्ण वाढल्याची शक्यता, डॉ. शशांक जोशी यांचं मत