मुंबई : मुंबईत होळीच्या सणानिमित्तानं होणाऱ्या सामुहिक आणि इतर सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावल्यानंतर राज्याच्या गृह विभागानं मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वात्या अशा शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 


Coronavirus Guidelines | कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जाहीर  


शब-ए-बारात म्हणजे काय? 


इस्लाम धर्मामध्ये दिनदर्शिकेनुसार येणारा आठवा महिना म्हणजे शाबान. या महिन्याच्या चौदा आणि पंधराव्या दिवसाची रात्र ही शब-ए-बारात म्हणून ओळखली आणि साजरी केली जाते. उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार अल्लाहची माफी मागण्याचा आणि आपल्या पूर्वज, पितरांसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस. शब-ए-बारातच्या रात्री चंद्रदर्शनाचं महत्त्वं असतं. या रात्री मुस्लीम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यात सुख, शांती, यश, समृद्धीसाठी प्रार्थना करतात. 


कोविड- 19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळंच या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 


सदर सूचना खालीलप्रमाणे.... 


- शब-ए-बारात निमित सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. 28 मार्च रोजीची रात्र व दि. 29 मार्च, 2021 ची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करणे उचित ठरेल. त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी.


Holi 2021 Celebration Guidelines: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाकेकडून निर्बंध लागू 


- स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी 40 ते 50 व्यक्तींनी टप्प्या-टप्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करून दुवा पठण करावी.


- मशिद व्यवस्थापक यांनी मशिद आणि त्या आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इ) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष यावे.


- शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करावे. परंतु खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.


- कोविड-19 च्या अनुषंगाने मुंबईमध्ये लागू असलेल्या फौजदारी दं.प्र.सं. कलम 144 अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे.


- शब-ए-बारातच्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.