मुंबई :  उद्यापासून विदर्भातील तापमान 40 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे.  यासोबतच मुंबई शहर, उपनगरासह आणि ठाण्यातील कमाल तापमान 35 ते 36 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र, तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. 


कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक आज पावसाची शक्यता  आहे. मात्र, त्यानंतर कमाल तापमानात वाढ होणार आहे.  सोलापूर, सातारा, सांगली आणि दक्षिण कोकणात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर  उत्तर कोकणातील तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची चिन्ह आहेत.  


पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस अधिक आहे.  पुढील दोन ते तीन  दिवस मुंबई आणि उपनगरातील तापमान 37  अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता असल्याची  भारतीय हवामान विभागाने दिली आहे.  मुंबई, ठाणे आणि उपनगरातील कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसमध्ये राहण्याचा अंदाज आहे. 


अंदमान आणि निकोबारमध्ये हलका पाऊस पडेल. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 


  हळूहळू तापनानात वाढ होणार असून  नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होणार आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.


संबंधित बातम्या :