Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच हा अर्थसंकल्प विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बुस्टर डोस मिळाल्याचे सांगतांना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करत असल्याचेही  म्हटले आहे.


कोरोनाचे संकट, निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली असतांनाही राज्य विकासाची घोडदौड कायम असल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की,विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राला या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिला आहे.  राज्यातील सिंचन क्षमता वाढवणे, 60 हजार कृषी पंपाना वीज जोडणे देणे, राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. निर्यातक्षम 21 शेतमालाचे क्लस्टर तयार केल्याने शेतमालाला चांगला भाव मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेहण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेले पुढील एक पाऊल आहे. जे जे काही करता येणे शक्य आहे, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढेही करणार आहोत, हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प जनतेसाठी आधार देणारा आणि विकास करणारा आहे. जनताही या अर्थसंकल्पाचे स्वागत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


राज्याच्या हिताचा अर्थसंकल्प - 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा अर्थसंकल्प राज्याच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. आमचं सरकार आल्यानंतर काही दिवसांत कोरोनाचं संकट ओढावलं. मागील दोन वर्षांपासून जगापुढे हे संकट उभं आहे. दोन वर्ष सर्वांची अडचणीची गेली. भारतासह जगाची अर्थव्यवस्था ढासळली. केंद्र सरकारने जीडीपीच्या साडेतीन टक्के कर्जाची मूभा दिली होती. पण आपण तीन टक्केमध्येच सर्व काही उरकले आहे.  आपण कोणत्याही विकासकामाला निधी कमी पडू दिला नाही. हे सर्व करत असताना विकासाची पंचसुत्री साधली आहे. यामध्ये कृषी, दळणवळण,मनुष्य, विकास आणि आरोग्य याची सांगड साधली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या :


 Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी
 Maharashtra Budget :'निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई' बजेट मांडताना अजितदादांचा शायराना अंदाज; दहा महत्वाच्या घोषणा
 Maharashtra Agriculture Budget Highlights : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
 Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी : अर्थमंत्री अजित पवार
 Maharashtra Agricultural Budget 2021 : गेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय होत्या घोषणा? अजित नवले म्हणाले घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांना लाभ नाही
Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live