मुंबई : राज्यात उद्या आणि परवा आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.  ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. कुठल्याही परिक्षार्थींची गौरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आज परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं सांगितलं. परभणीतील रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला.


राजेश टोपे म्हणाले की, " केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केद्राची पत्ता चुकला होता, तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. आठ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असून त्याच्या योग्य प्रकारच्या नियोजनासाठी बाह्य स्त्रोत नेमण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल टिकीट्स डाऊनलोड होत नाहीत त्यांना ईमेल्स केले जात आहेत, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनना याबाबत अधिकार देण्यात आले असून ते अशा विद्यार्थ्यांना मदत करतील. 


महत्वाच्या बातम्या :