राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Sharad Pawar : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद चिघळण्याची शक्यता; शरद पवार घेणार सक्रिय भूमिका


Sharad Pawar : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. हाच वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी या वादात सक्रिय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ असे मिळून 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 


Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी असून सुरक्षेची गरज नाही, ज्यांनी बेईमानी केली, सुरक्षा त्यांना द्या, संजय राऊतांचे खडे बोल 


Nashik Sanjay Raut : 'माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे त्यांचे संतुलन बिघडलं. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. ज्यांनी बेईमानी केली, त्यांना सुरक्षा द्या. मी वन मॅन आर्मी असून मला सुरक्षेची गरज नाही, त्यामुळे मला दिलेली सुरक्षा परत पाठवा, अशी विनंती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. आणि माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरणही त्या प्रकरणावर दिले आहे. वाचा सविस्तर 


Maharashtra Talathi Bharati 2023 : मोठी बातमी! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश


Maharashtra Talathi Bharati 2023 : गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी (Talathi) पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर 


Samriddhi Highway Accident : चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट दुसऱ्या लेनवर जाऊन आदळली, शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात


Samrudhhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Mahamarg) अपघातांची (Accident) मालिका सुरुच आहे. नुकत्याच उद्घाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर (Shirdi To Bharvir Highway) पहिलाच अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे. शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावरील सिन्नरच्या पूर्व भागात हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. वाचा सविस्तर 


मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना


Fatal attack on Mumbai Police team : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, तपासकामी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींना देखील जमावाने पळवून लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


Pune Crime News : सामूहिक अत्याचाराने पुणे हादरलं! तीन नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीने शिक्षकांना सांगितला प्रकार


Pune Crime News : मागील काही दिवसांपासून पुण्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पुण्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि बाकी दोन जणांचा शोध सुरु आहे. शाळेतील समुपदेशनाच्या (Counseling) वर्गातून हा प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर