राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. वाचा सविस्तर
अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, 'मातोश्री'वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला
"अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे," अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर "जनतेला जागं करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. वाचा सविस्तर
कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवार सरसावले
णेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोणकोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसंच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. वाचा सविस्तर
लासलगाव बाजार समितीत दोन्ही गट एकत्र; भुजबळ गटाचे बाळासाहेब क्षिरसागर सभापतीपदी
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या दोन्ही गटांना एकत्र करत भुजबळ समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापती पदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी दिली. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. वाचा सविस्तर
मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 19.5 टक्के पाणी शिल्लक
मुंबईत पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई समोर पाणी कपातीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे. वाचा सविस्तर