Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी होत आहे. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापूर्वी पँथर्स आर्मीने हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी केली. तर मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे. 


पँथर्स आर्मीकडून पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं औरंगाबाद विमानतळास तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे नाव देण्याच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र शासन दरबारी याची कोणतीही दखल घेतली जात नाही. याशिवाय जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ अजिंठा लेणीकडे जाताना हर्सूल टी पॉईंट येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसविण्याबाबत पँथर्स आर्मीच्या वतीनं शासनाकडे मागणी करण्यात येत आहे. पण याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारनं आमच्या या मागणीचा प्राधान्यानं विचार करून तातडीनं हर्सूल टी पॉईंट येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत पँथर्स आर्मीच्या वतीने देण्यात आला.  


...अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू


छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे आणि बुद्धांची भूमी म्हणून या शहराची जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख आहे. तर हर्सूल टी पॉईंट येथून अजिंठा वेरूळकडे जाणाऱ्या मार्गावरून अंतरराष्ट्रीय आणि विविध देशातून आलेले पर्यटक गौतम बुद्धांना अभिवादन करून वेरूळ अजिंठा लेणी पाहतील. त्यामुळे गौतम बुद्धांचा पुतळा बसवल्यास गौतम बुद्धांच्या विचारांची प्रत्येकामध्ये एक उर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल. या महामार्गाला जागतिक दर्जाचे महत्व प्राप्त होईल. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारनं आमच्या या मागणीचा प्राधान्यानं विचार करून तातडीनं हर्सूल टी पॉईंट येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा. अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत पँथर्स आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण कार्यक्रम?