राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
'तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात?' राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल
: शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. (वाचा सविस्तर)
राज्यात सर्वाधिक असुरक्षित प्रसूती नंदुरबार जिल्ह्यात; दोन हजारपेक्षा अधिक मातांची घरीच प्रसूती
संस्थात्मक व सुरक्षित प्रसूतीसाठी जिल्ह्यात शासनाने कितीही प्रयत्न सुरू केले असले, तरी कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar Distric) घरीच होणार्या असुरक्षित प्रसूतीचे (Delivery) प्रमाण आधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात हे प्रमाण 0.41 टक्के असताना, नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण 8.36 टक्के इतके आहे. हे आकडे राज्यातील सर्वात जास्त आहे. (वाचा सविस्तर)
मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे संभाजीनगरात उद्घाटन, महसूलमंत्री मंत्र्यांची उपस्थिती
शासनाने घोषणा केल्याप्रमाणे यंदा जिल्ह्यात 600 रुपये ब्रास वाळू मिळणार की नाही असा प्रश्न असताना जिल्ह्यात काही ठिकाणी निविदा अंतिम झाल्याने आता नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळणार आहे. दरम्यान शनिवारी (20 मे) रोजी छत्रपती संभाजीनगरच्या ( वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मराठवाड्यातील पहिला वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)
आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या भाकरी फिरवण्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. काल विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी कोल्हापूर येथे भाकरीचा पुन्हा उल्लेख केल्याने चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलंय. (वाचा सविस्तर)
लम्पीचीही 'दुसरी लाट', पशुपालकांमध्ये चिंता; लसीकरण करून घेण्याचे आवाहन
गेल्यावर्षी राज्यभरात जनावरांमध्ये लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. त्यानंतर सरकराने लसीकरण राबवत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. मात्र आता पुन्हा एकदा लम्पीची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. (वाचा सविस्तर)