कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या भाकरी फिरवण्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. काल विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी कोल्हापूर येथे भाकरीचा पुन्हा उल्लेख केल्याने  चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलंय. 


अजित पवार यांनी मेळाव्यात बोलताना भाकरी फिरवावी लागणार आहे आणि भाकरी फिरवली जाणार असल्याचे सुतोवाच केले. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व तयार करण्याचा आता आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये काम करायला लावले. मी सांगितले तसे काम केले आणि काँग्रेसकडे असणार मतदारसंघ आपल्याकडे आला. कुठल्याही मतदारसंघात कुणाची मक्तेदारी नसते, असेही अजित पवार म्हणाले.  शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय सर्वांच्या आग्रहाखातर घेतला. यामुळे मरगळ आलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आता कामाला लागला असल्याचे ते म्हणाले. मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही, पण मुख्यमंत्री कधी कधी काय बोलतात हे कळत नाही, नुसते सर्वसामान्यांचे सरकार आहे म्हणायचे, पण सर्वसामान्यांसाठी काय केले हे सांगा? असा टोला त्यांनी लगावला. 


कोल्हापूर जिल्हा नेहमीच शरद पवारांच्या जवळचा


मी वस्ताद आहे, कार्यकर्त्यानो तुमची ताकद दाखवा. आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला जागा वाटपात स्थान देण्याचे बघतो. महापालिका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, नंतर लोकसभा लागतील. त्यामुळे राज्य ढवळून काढावे लागेल, असेही अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्या विचाराने राष्ट्रवादी पक्ष चालवला जात आहे. कोल्हापूर जिल्हा नेहमीच शरद पवारांच्या जवळचा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावं लागेल.  


पाह, काय म्हणाले अजित पवार?



 


पवारांनी भाकरी फिरवली नाही तर तवाच  फिरवला


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चेंबूर येथील युवा मंथन शिबिरात पक्षातील सहकाऱ्यांशी बोलून लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं म्हंटलं होते.  त्यानंतर  शरद पवारांनी राज्याच्या राजकरणात  खळबळ उडवून दिली होती. पवारांच्या निर्णयानंतर मुंबईसह राज्यात राजकीय नाट्य रंगलं.  शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि पवारांनी भाकरी फिरवली नाही तर तवाच  फिरवला, अशी भावना अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर  शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.  


हे ही वाचा :