Gudi padwa 2023 Live Updates : गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Gudi Padwa 2023 : हिंदू धर्मात गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) या सणाला फार महत्त्व आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2023 01:34 PM
Pandharpur : तुळस अर्चन पूजेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद

Pandharpur : आज गुढी पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर सुरु केलेल्या तुळशी अर्चन पूजेस स्थानिक आणि भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशीच्या सर्व 30 पूजा फुल झाल्या आहेत. आज सकाळी महानैवेद्याच्या वेळेला पहिल्या स्लॉटमधील पहिले 10 कुटुंबीय सकाळी दहा वाजल्यापासून मंदिरात पूजेसाठी जमले होते. विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे या कुटुंबाना बसवून मंदिराच्या गुरूंकडून पूजेस सुरुवात झाली . विष्णू सहस्त्रनाम म्हणत पूजेचा संकल्प सोडण्यात आला . यावेळी मंदिराच्या वतीने तुळशी फुले आणि सर्व पूजेचे साहित्य भाविकांना देण्यात आले होते . 

Yavatmal Gudi Padwa:  यवतमाळच्या माईंदे चौक येथे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 51 फुटांची गुढी उभारली

Yavatmal Gudi Padwa:  यवतमाळच्या माईंदे चौक येथे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 51 फुटांची गुढी उभारण्यात आली. या चौकात 1966 मध्ये शिवसेनेकडू  जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीधर मोहोड यांनी शाखा उघडली  होती. यावेळी जिल्हावर आले अवकाळी पावसाचा संकट दूर होऊ दे यासाठी शेतकऱ्यांना समर्पित 51 फुटांची गुढी उभारली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Raj Thackeray :  राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी गुढीपाडवा साजरा

Raj Thackeray :  राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी गुढीपाडवा साजरा केला. 

Ajit Pawar Gudi padwa : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उभारली गुढी

Ajit Pawar Gudi padwa : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला. यावेळी अजित पवारांनी सपत्नीक गुढीची पूजा केली. 


 





 Girgaon Shobha Yatra : मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरूवात, 22 फुटांची गुढी उभारली

 Girgaon Shobha Yatra : मुंबईच्या गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातोय. मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर शोभायात्रेत सहभागी झाले आहेत.. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झालीये. 22 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे... 
 

 Thane Gudi Padwa: ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सव देवीच्या आगमन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

 Thane Gudi Padwa: यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली.  त्यानंतर ते स्वःत जांभळी नाका, टेंभी नाका चरई ते हरिनिवास सर्कल पर्यंत स्वागत यात्रेत सहभागी झाले. या दरम्यान ठाणेकरांनी स्वागत केलं तर मुख्यमंत्री सुद्धा ठाणेकरांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत होते.


 


 Thane Gudi Padwa: ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सव देवीच्या आगमन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

 Thane Gudi Padwa: यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली.  त्यानंतर ते स्वःत जांभळी नाका, टेंभी नाका चरई ते हरिनिवास सर्कल पर्यंत स्वागत यात्रेत सहभागी झाले. या दरम्यान ठाणेकरांनी स्वागत केलं तर मुख्यमंत्री सुद्धा ठाणेकरांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत होते

Nagpur Gudi Padwa:  नागपूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, पारंपारिक वेषभूशा परिधान करुन नागरिक मिरवणुकीत सहभागी

Nagpur Gudi Padwa:  नागपूरमध्येही गुढीपाडवा जल्लोषात साजरा केला जातोय. त्यानिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आलीये. सिद्धिविनायक ट्रस्टकडून नववर्षाच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आलीये... नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.. पारंपारिक वेषभूशा परिधान करुन नागरिक मिरवणुकीत सहभागी झालेत..  

Pune Gudi Padwa :  पुण्यातदेखील मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा,  बावधनमध्ये शोभायात्रा

Pune Gudi Padwa :  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातदेखील मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा केला जातोय.  यानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत..  बावधनमध्येदेखील शोभायात्रा काढण्यात आली असून यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या

Pune Gudi Padwa : पुण्यात बावधनमध्ये हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून शोभायात्रेचे आयोजन

  Pune Gudi Padwa : पुण्यात बावधनमध्ये हिंदू नववर्ष स्वागत समिती यांच्याकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले भगवान राम, लक्षण, सीता यांच्या वेशभूषेत तयार झालेत तर अनेक महिला पारंपरिक वेशभूषा करून एकत्र आलेले आहेत. ढोल ताशा पथक, लेझीम, पोवाडे यासह ही शोभा यात्रा पार पडेल 

Nagpur Gudi Padwa: नागपूरात गुढीपाडव्याचा जल्लोष,शहरात शोभायात्रा

Nagpur Gudi Padwa: नागपूरमध्येही गुढीपाडवा जल्लोषात साजरा केला जातोय. त्यानिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आलीये. सिद्धिविनायक ट्रस्टकडून नववर्षाच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आलीये. नागपूरच्या तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.. पारंपारिक वेषभूशा परिधान करुन नागरिक मिरवणुकीत सहभागी झालेत..  

Ratnagiri Gudi Padwa: रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह

Ratnagiri Gudi Padwa: राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा केला जातो.  जिल्ह्यातल्या लांजामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीपासून देवाच्या नावाचा जयघोष करत, पारंपरिक गाणी म्हणत रात्रभर जागर करत मराठी नवीन वर्षाचे स्वागत केलं जातं. गावातील पाचाचा मांड या ठिकाणी सर्वधर्मीय आणि लहान थोर एकत्र येतात आणि पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणत जागर करतात. याला स्थानिक भाषेत घोरीप असे म्हणतात. घोडा नाचवणे आणि हत्तीचे रूप हा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करत असताना देवाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे याच उद्देशाने घोरीप हा प्रकार साजरा केला जात असावा असं बुजुर्गांचं म्हणणं आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा, स्थानिक बोली भाषेतील जुनी गाणी, त्यातून केलं जात असलेले समाज प्रबोधन, विविध विषयांची महती असा हा सोहळा परंपरा जपणारा असतो. मराठी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना अशा पद्धतीने रात्रभर होणारा जागर हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असावा. मुख्य गोष्ट म्हणजे याच घोरीपनंतर गावात गुढ्या उभारण्यास सुरुवात होते. शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच आपुलकीने आणि पारंपरिकता जपत साजरी केली जाते. त्यामुळे याला एक वेगळं महत्त्व आहे. रात्री सुरू झालेला जागर अगदी पहाटेपर्यंत सुरू असतो.

Gudi Padwa Updates:  गुढीपाडव्यानिमित्त आज ठिकठिकाणी शोभायात्रा

Gudi Padwa Updates:   गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करतायत.. प्रत्येकजण आनंदाची, सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होतायत. ..तसंच आज ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातायत.. या शोभायात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदाने, अभिमानाने सहभागी होतायत. यासोबतच अनेक सेलिब्रेटीही या शोभायात्रेत  सहभागी झालेत... मुंबईसह पुणे,कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय. 

Thane Gudi Padwa:  ठाण्यातील कोपरीतील श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

Thane Gudipadwa:  ठाण्यातील कोपरी इथल्या श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. दरवर्षी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत देवीचा आगमन सोहळा पार पाडतो. मात्र यंदा मुख्यमंत्री पद तसेच अधिवेशन सुरू असल्याने कोपरीकरांना मुख्यमंत्री येणार की नाही याची धास्ती होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मतदारसंघात साजरा होणाऱ्या या उत्सवात वेळात वेळ काढून हजर राहिले.. आणि त्यांनी केवळ हजेरी लावली नाही, तर सामान्य ठाणेकराप्रमाणे मिरवणुकीत सहभागी झाले आणि नंतर त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली..

Tuljapur Gudi pdwa:  तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी, गुढीपाडव्यानिमित्त देवीची अलंकार पूजा

Tuljapur Gudi pdwa:   महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं, आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलान दिवस असल्यानं देवीची अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. 

पार्श्वभूमी

Gudi Padwa 2023 :   साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक, असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काही जण या दिवशी सोनं खरेदी करतात, काही नवीन कार घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात.


गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करतायत.. प्रत्येकजण आनंदाची ,सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होतायत. ..तसंच आज ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातायत.. या शोभायात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदाने, अभिमानाने सहभागी होतायत. यासोबतच अनेक सेलिब्रेटीही या शोभायात्रेत  सहभागी झालेत... मुंबईसह पुणे,कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय. 


गुढी पाडव्याचे महत्व (Importance Of Gudi Padwa 2023)


गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. त्याच वेळी, भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून, तिची पूजा करतात. असे मानले जाते की, गुढी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.


त्याचबरोबर काही लोक या दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते.


सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. याला गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) असेही म्हणतात. यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. यावेळीशरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरु होतो. झाडांना कोरड्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येऊ लागतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.