Gram Panchayat Election 2022 Live Updates : आज 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 18 Dec 2022 07:44 AM
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; 

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. या मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील यापूर्वी 60 गावांमधील सरपंच व विविध गावातील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ज्या गावात निवडणूक लागली त्या गावातील जाहीर प्रचाराची शक्तिप्रदर्शनाने झाली होती. सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी  रिंगणात असलेल्या 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल.

Gram Panchayat Election 2022 Live Updates : मेंगडेवाडीचे मतदान केंद्र अचानक चऱ्हाटा येथे हलविले, ग्रामस्थांचं रात्रीच तहसिलसमोर ठाण

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसिलसमोर ठाण मांडले होते. बीड तालुक्यातील मेंगडेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्र अचानक तेथील केंद्र चऱ्हाटा येथे हलविण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी बीड तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडले असून मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी होते.

Gram Panchayat Election 2022 Live Updates : ग्रामपंचायतींसाठी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार

Gram Panchayat Election 2022 Live Updates : आज 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.

Gram Panchayat Election 2022 : नंदुरबार जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार

Nandyrbar Gram Panchayat Election 2022 : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 04 आणि अक्राणी तालुक्यात 04 ग्रामपंचायती या अतिदुर्गम भागांत समावेश होतो. यामुळे 08 ही ग्रामपंचायती मध्ये सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या आठ ग्रामपंचायती या अतिदुर्गम भागात वसलेल्या असल्याने याठिकाणी पोहचण्यासाठी मतदान यंत्रणेला अनेक किलो मीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे परताना रात्रीच्या अंधारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ग्रामपंचायतींच्या मतदानाची वेळी ही फक्त साडेतीन वाजेपर्यत असणार आहे.  

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

Gram Panchayat Election 2022 Live Updates : गावागावात पोलिसांचा फौजफाटा


ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत. 

Gram Panchayat Election 2022 Live Updates : विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates : विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या


अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751. 

Gram Panchayat Election 2022 Updates : आज राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी मतदान

राज्यातील विविध जिल्ह्यांतील तब्बल 7,751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी, 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठीची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही निवडणूक होत आहे. 

पार्श्वभूमी

Gram Panchayat Election 2022 Live Updates : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election)  सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान (Gram Panchayat Voting) होणार आहे.  या निवडणुकीचा निकाल  20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.  
 
विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या


अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751. 


गावागावात पोलिसांचा फौजफाटा


ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत. 




 



एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक


एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून आज त्या त्या गावात पोलिंग पार्टी रवाना होतील. विदर्भामध्ये दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात 236 तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सोबतंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गावामध्येसुद्धा निवडणूक होत आहे. या व्यतिरिक्त विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात सुनील केदार, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, मंत्री संजय राठोड यांच्या सारखे सारखे दिगग्ज नेत्यांचा समावेश आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी  (Kolhapur District Gram Panchayat Election)


कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे.  उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 


नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका (Nashik Gram Panchayat Election) 


नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकूण 745 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात आहेत. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतीत मतदान होणार(Sindhudurg Gram Panchayat Election)


सिंधुदुर्ग  जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीपैकी 293 ग्रामपंचायतीसाठी 933 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठीच्या मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. 


अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक (Amravati Gram Panchayat Election)


अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 14 तालुक्यांतील 2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व 413 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.  


सोलापूरमध्ये 1418 जागांसाठी मतदान (Solapur Gram Panchayat Election)


सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक होईल.  त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल.  सरपंचपद वगळून 20 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.. सरपंचसहित 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.


नागपूर जिल्ह्यात 236 सरपंच पदांसाठी 761 उमेदवार (Nagpur Gram Panchayat Election)


राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (Gram Panchayat Election)पार पडत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.