मुंबई : कोरोनाचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल, महाराष्ट्रात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अशा RTPCR चाचणीची गरज नसेल असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 15 दिवस पूर्ण झाले पाहिजेत.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवासावर आणि इतर गोष्टींवर सरकारच्या वतीनं अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता RTPCR चाचणीचा अहवाल दाखवणं बंधनकारक नाही. त्यासाठी कोविन या पोर्टलवरुन दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट दाखवले तरी चालणार आहे. फक्त दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 15 दिवस पूर्ण झाले पाहिजेत.
या आधी राज्यात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे. ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांनी प्रवास करण्यापूर्वी गेल्या 72 तासांतील RTPCR चाचणी दाखवणं गरजेचं आहे. या आधी ही कालमर्यादा 48 तासांची होती.
राज्य सरकारचा हा नियम इतर राज्यातल्या प्रवाशांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही लागू होणार आहे. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस जरी घेतले असले तरी प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर या कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे असंही राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
पहा व्हिडीओ : Maharashtra Unlock: देशांतर्गत विमान प्रवासासाठी 'या' नागरिकांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही
महत्वाच्या बातम्या :
- शहरी नक्षलवाद प्रकरण : सुधा भारद्वाज आणि अन्य आरोपींचा दावा तथ्यहिन, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका
- Navi Mumbai Metro : मेट्रो रेल्वेच्या परिचालन आणि देखभालीकरिता महामेट्रोला स्वीकारपत्र; लवकरच करारनामाही केला जाणार
- Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल