Maharashtra government staff strike: जुन्या पेन्शनसाठीच्या संपावर अद्याप तोडगा नाहीच, राज्यभरात सर्वसामान्यांचे हाल

Maharashtra government staff strike: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वसामान्य जनतेला या संपाचा जबर फटका बसतोय.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Mar 2023 01:40 PM
Buldhana Strike: जुन्या पेन्शनसाठी अभ्यास समिती आणि कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची संपकरी आंदोलकांकडून होळी

Buldhana Strike:  जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारकडून अभ्यास समितीची त्याचबरोबर कंत्राटी भरतीसाठी शासन आदेश काढण्यात आला आहे. मात्र या अभ्यास समिती आणि कंत्राटी भरती शासन आदेशाची आज  बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन पुकारणाऱ्या संपकरी आंदोलकांकडून शासन आदेशाची  होळी करण्यात आली आहे.  यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन तात्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा या संपकरी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Strike: 'जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा!' अर्ध्या पगारावर काम करण्यास तयार, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Maharashtra Strike: सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी  संप पुकारल्याने विरोधातील आणि समर्थनातील  प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियात सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त  प्रतिक्रिया उमटत आहेत. संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात  सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटलंय

Mumbai Strike:  महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि संवर्ग कर्मचारी संघटनेची संपामधून माघार

Mumbai Strike:  महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि संवर्ग कर्मचारी संघटनेने संपामधून माघार घेण्याचा निर्णय  घेतला आहे. संघटनेचे अंदाजे 60 हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसहीत विविध मागण्यासाठी संपावर होते . या संघटनेची या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या सोबत संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, सुरेश पोसतांडेल,चरण सिंग टाक, नागेश कंदारे,विश्वाथ घुगे यांची  बैठक झाली. या बैठकीत संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने या संघटनेने संपातुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ahmednagar Strike: अहमदनगरच्या रुग्णालयात रुग्णांना मिळते संपातही सुविधा

Ahmednagar Strike:  सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू केलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा प्रभावित झाल्याचे चित्र आहे. अहमदनगरमध्ये आरोग्य यंत्रणा ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनता जिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी कर्मचारी काम करत असून सध्या तरी तिथे रुग्णांना सुविधा मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच कोणतेही अत्यावश्यक सुविधांना अडचणी निर्माण होत नाही.

Mumbai Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची धग बांधकाम भवनापर्यंत, सार्वजनिक बांधकाम भवनातील कर्मचारी देखील संपावर

Mumbai Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची धग बांधकाम भवनापर्यंत  पोहचली आहे. सार्वजनिक बांधकाम भवनातील कर्मचारी देखील संपावर गेले आहेत. मागील तीन दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरुच आहे. जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आंदोलन केले आहे. 

Nagpur Strike: नागपूर जिल्हा परिषदेचे अंदाजे 1600 कर्मचारी संपावर

Nagpur Strike: नागपूर जिल्हा परिषदेचे अंदाजे 1600 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह  कृषी आणि शिक्षण विभागाचं कामकाज ठप्प झालंय.  ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे .

Mumbai Strike:  आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम, जे.जे. रुग्णालयातील रुग्णांच्या  शस्रक्रियाही पुढे ढकलल्या

Mumbai Strike:  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात रुग्णांच्या  शस्रक्रियाही पुढे ढकलल्या जातायत. त्यामुळे रुग्णांचे हाल होतायत... 

Maharashtra government staff strike : संप बेकायदेशीर, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात

Maharashtra government staff strike :  जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात




मागण्या रास्त असू शकतात मात्र संप हा बेदायदेशीरच, याचिकेत दावा


सध्या राज्यभरात सुरू असलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका


वकील गुणरत्न सदावर्ते तातडीच्या सुनावणीसाठी करणार विनंती


विद्यार्थी आणि रूग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला



Dhule Strike: कर्मचाऱ्यांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम, जिल्हा रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया रद्द

 धुळे जिल्हा रुग्णालयातील नियोजित सर्वच शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. अत्यावस्थ  जिल्हा रुग्णालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले असून सध्या एन आर एचएम च्या फक्त 22 कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी असून यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांवर फक्त उपचार करण्यात येत आहे. 

Ahmednagar News: अहमदनगरच्या ग्रामीण रुग्णालयावर संपाचा परिणाम

Ahmednagar News: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यात सरकारी - निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. या संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य विभागाला बसला आहे. . ग्रामीण भागात रुग्णालय ओस पडली आहे. अहमदनगरच्या रुग्णालयाला देखील याचा फटका बसला आहे. 

Maharashtra government staff strike: महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटनेची संपातून माघार

 Maharashtra government staff strike: महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली आहे. या संघटना संपात सहभागी न होता, काळ्या फिती लावून कामावर रुजू होणार आहेत. 

पार्श्वभूमी

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली. याचं कारण म्हणजे राज्य सरकारनं जरी अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो समन्वय समितीला मान्य नाही. मात्र यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायेत.. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.. तर  सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालयं. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो. 


रुग्णालये कोलमडली, प्रशासकीय काम खोळंबले, शेतीचे पंचनामे रखडले


सरकारी कर्माचाऱ्यांचा संप सुरू होऊन 48 तास उलटले तरी सरकारने अद्याप संपाची दखल घेतलेली नाही. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामं खोळंबली आहेत. तर कुठे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकार या संपावर कधी तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.


कर्मचाऱ्यांची पेन्शन, मात्र जनतेला का टेन्शन? दोघांंचं भांडण नागरिकांना फटका


सरकारी कर्माचाऱ्यांचा संप सुरू होऊन 48 तास उलटले तरी सरकारने अद्याप संपाची दखल घेतलेली नाही. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामं खोळंबली आहेत. गाव-खेड्यातली, वाड्या-वस्त्यांवरची माणसं तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कामं घेऊन तर येतायत, मात्र तहसीलदार कचेऱ्या, जिल्हाधिकारी कार्यालयं, कृषी विभागासह सगळ्याच सरकारी कचेऱ्यांमध्ये संपामुळे कर्मचाऱ्यांचा पत्ताच नाही. त्यामुळे, कचेऱ्यांच्या बाहेर शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध मंडळींच्या जत्थेच्या जत्थे बसून आहेत. दिवसभर उन्हातान्हात ताटकळत बसायचं, बांधून आणलेला शिधा कचेरीच्या आवारातस बसून खायचा आणि सूर्य मावळतीला लागला की गावाकडे परतायचं... कर्मचाऱ्यांच्या संपामुळे असं सगळं धूळ पेरलेलं जगणं गावाकडच्या लोकांच्या वाट्याला आलंय. गेल्या काही दिवसांआधी अवकाळीने केलेला चिखल अजून पुरता सुकलेलाही नाहीय, त्याच्या नुकसानीचे पंचनामे आता कुठे सुरू होत होते, तर आता कर्मचाऱ्यांच्या संपाचा डोंगर आ वासून उभा राहिलाय. पंचनाम्यांच्या कामांनाही मोठा ब्रेक लागलंय. तर तिकडे, संपामुळे आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर गेलीय. गरोदर महिला, आजारी माणसं, पोरं-टोरं, म्हातारी माणसं सरकारी दवाखान्यात येतायत, मात्र केस पेपर काढायला कर्मचारीच नाहीयत. एकाददुसरा डॉक्टर असला तरी, केस पेपरच नसल्यामुळे तो रुग्णाला हातही लावायला तयार नाहीय. त्यामुळे आजाराने खितपत पडलेले रुग्ण वेदना तशीच दाबत माघारी फिरतायत. हे सगळं होत असताना विद्यार्थीही संपाच्या त्रासातून सुटलेले नाहीयत. नागपुरात एका शाळेनं तर, शाळेत येऊ नका असं थेट बोर्डच लावून टाकलंय. एकूणच काय तर, या सगळ्या त्रासामुळे, कर्मचाऱ्यांची पेन्शन, मात्र जनतेला का टेन्शन असा सवाल आता विचारला जातोय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.