Maharashtra New CM Oath Ceremony LIVE : एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Eknath Shinde Oath ceremony Live Updates :भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज शपथविधी घेणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jun 2022 09:42 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

नारायण राणेंचं ट्विट

 महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे हार्दिक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अराजकतेला लगाम बसेल व राज्य पुन्हा प्रगतिपथावर अग्रेसर होईल ही खात्री आहे, असे ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेय. 

Eknath Shinde : नव्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांचे नितीन गडकरींकडून अभिनंदन

देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या नव्याने समोर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं अभिनंदर केलं आहे. त्यांनी अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत अभिनंदन केलं असून 'पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो,' असं ते म्हणाले आहेत.


 





Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर गडकरींनी केलं अभिनंदन

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर गडकरींनी केलं अभिनंदन

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE : एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला सुरूवात

एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे.

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. अमित शाहंनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 





Jayant Patil : एकनाथ शिंदें यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर जयंत पाटलांच्या शुभेच्छा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा शपथविधी थोड्याच वेळात

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंचा शपथविधी होणार आहे. 

Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर शरद पवारांच्या शुभेच्छा



Devendra Fadanvis : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.

जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार : एकनाथ शिंदे

रात्रंदिवस काम करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. महाराष्ट्रात मजबूत सरकार दिसेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

दवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं; एकनाथ शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

दवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं.  शिवाय मंत्रिमंडळात देखील ते सामिल होणार नाहीत, असे कौतुक एकनाथ शिंदे यांनी केले. 

Eknath Shinde : फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोठे केले : एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीसांकडे 120 संख्याबळ आहे. त्यांना सहज मुख्यमंत्री होता आले असते. पण फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोठेपणा दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो

महाविकास आघाडीत असताना मतदारसंघात अनेक अडचणी येत होत्या : एकनाथ शिंदे

महाविकास आघाडीत असताना मतदारसंघात अनेक अडचणी येत होत्या. अनेक निर्णय घेता येत नव्हते, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस नव्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत

देवेंद्र फडणवीस नव्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

Maharashtra Government Formation : निकालानंतर शिवसेनेने निर्णय बदलला : देवेंद्र फडणवीस

2019 साली भाजप आणि युतीचे सरकार होईल अशी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळचे आमचे मित्र शिवसेनाप्रमुखांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म ज्यांचा विरोध केला, अशा कॉंग्रेससोबत युती केली. जनतेने युतीला मत दिले होते. परंतु निकालानंतर शिवसेनेने निर्णय बदलला

Maharashtra Government Formation : फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांकडून पेढा भरवून अभिनंदन

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान आज संध्याकाळी दोन्ही नेत्यांचा शपथविधी होणार आहे.  

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनकडे रवाना, सत्ता स्थापनेचा दावा करणार

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेते राजभवनला गेले. राज्यपालांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करतील तर एकनाथ शिंदे भाजपला पाठिंब्यांचं पत्र देतील. त्यानंतर रात्री सात वाजता दोन्ही नेत्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Government Formation : वांद्रे-वरळी सी लिंक क्रॉस करुन एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना

Maharashtra Government Formation LIVE : वांद्रे-वरळी सी लिंक क्रॉस करुन एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. विमातळापासून राजभवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

Maharashtra Government Fomation : एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होण्याची शक्यता

Maharashtra Government Fomation : एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरबार हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान दोघे शपथबद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

Maharashtra Government Formation : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगत सिंह यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर संध्याकाळी ही पत्रकार परिषद होऊ शकते. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या आरोपांना या पत्रकार परिषदेत उत्तरं दिली जातील.

Maharashtra Government Formation : नव्या सरकारचा शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी होण्याची शक्यता

Maharashtra Government Formation : नव्या सरकारचा शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज दुपारी सागर बंगल्यावर भेट घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता दोन्ही नेते राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 

Raj Thackeray on Maharashtra Political Crisis : नाव न घेता राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Government Formation LIVE : उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलेलं नाही : दीपक केसरकर

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना, राज्यपालांची भेट घेणार

Maharashtra Political Crisis : शिवनेते बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पुढची भूमिका तुम्हाला सांगू, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील कुणाची नवीन मंत्रिमंडळात वर्णी?

काल रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळले, शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदार आहेत. तसेच जिल्ह्यात अगोदरच तीन आमदार भाजपचे आहेत. एकूण 5 आमदार नवीन सत्तेत सहभागी होत आहेत. आता यातील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर या दोघांपैकी चार वेळेस आमदार निवडून आलेले रायमुलकर आहेत, तसेच भाजपचे आमदार संजय कुटे आणि श्वेता महाले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागते का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. यांपैकी संजय कुटे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंसह आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित, सुनावणीपूर्वी 1 लाखांची अनामत रक्कम जमा करा : हायकोर्ट

एकनाथ शिंदेंसह आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका राजकीय हेतूनं प्रेरित - हायकोर्ट


सुनावणीपूर्वी 1 लाखांची अनामत रक्कम जमा करण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश


राज्यातील सात नागरीकांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत मिळून दाखल केली आहे याचिका


तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या बोलण्यावर बंदीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली


याचिकाकर्ते हेमंत पाटील यांना वैयक्तिक तक्रारीकरता दंडाधिकारी कोर्टात दाद मागण्याचे निर्देश

CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल यांनी कार्यभार दिला

CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल यांनी कार्यभार दिला, पुढचे सरकार येईपर्यंत कामकाज पाहण्याच्या सूचना, मात्र कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय ते घेऊ शकणार नाहीत

Sanjay Raut LIVE : उद्या दुपारनंतर ई़डीसमोर हजर होणार आहे, कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार : संजय राऊत 

Sanjay Raut LIVE : उद्या दुपारनंतर ई़डीसमोर हजर होणार आहे, कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार : संजय राऊत 

Sanjay Raut LIVE : महाराष्ट्राच्या नव्या सरकारने जनहिताचं काम करावं, यासाठी शुभेच्छा : संजय राऊत

Sanjay Raut LIVE : सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं आहे. सरकार पाडण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न सुरु होते. महाराष्ट्राच्या नव्या सरकारने जनहिताचं काम करावं, यासाठी शुभेच्छा : संजय राऊत

Maharashtra Political Crisis : आम्ही आजपासून विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे भूमिका पार पाडणार : नाना पटोले

Maharashtra Political Crisis : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्या संदर्भात नाराजी असण्याची गरज नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, त्यांना शुभेच्छा," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. "आम्ही आजपासून विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे भूमिका पार पाडणार आहोत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आम्ही आजपासून तयारी करत आहोत. त्यासाठी सर्व आमदारांची बैठक आहे. शेतकरी, ओबीसी, मराठा आणि मागासवर्ग यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Eknath Khadse on Eknath Shinde : भाजप आणि शिंदे गट यांची अलिखित छुपी युती होती, भाजपसोबत जाण्याची भूमिका त्यांची पूर्वीपासूनच होती : एकनाथ खडसे

Eknath Khadse on Eknath Shinde : भाजप आणि शिंदे गट यांची अलिखित छुपी युती होती. आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली नाही. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली, त्यामुळे पूर्वीपासूनच भाजपसोबत जाण्याची त्यांचा भूमिका होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन स्थगित, राज्यपालांचा आदेश

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बोलावलेलं विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.



Maharashtra Political Crisis : गोव्यात शिंदे गटातील आमदारांची बैठक, सर्व आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता

Maharashtra Political Crisis : गुवाहाटीमधून गोव्यात पोहोचलेल्या एकनाथ शिंदे गटाची आज बैठक होणार आहे. सकाळी नऊच्या सुमारास आमदारांच्या बैठकीला सुरुवात होईल, असं सांगितलं जात आहे. दरम्यान गोव्यात असलेले हे आमदार आज मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. मुंबईत आल्यावर त्यांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असेल, जिथे भाजपचे आमदार आधीच मुक्कामाला आहेत. यानंतर संध्याकाळी भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार मुंबईत दाखल होण्याची शक्यता, विमानतळ ते दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवला

Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार मुंबईत दाखल होण्याची शक्यता असल्याने विमानतळ ते दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त कुमक वाढवण्यात आली आहे. सकाळी चार वाजल्यापासून विमानतळ ते वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोलीस तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Maharashtra Political Crisis : संजय राऊतांचा सामनाच्या अग्रलेखातून निशाणा, भाजपला थेट प्रश्न

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतून झालेल्या या बंडखोरीसाठी अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना नव्हे तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना व्हिलन बनवलं. आमदारांनी बंडखोरी करत गुवाहाटी गाठल्यानंतर संजय राऊतांनी आपल्या कडव्या भाषेत सर्व बंडखोरांवर टीका केली होती. 40 मुडदे, गद्दार, घाण असे अनेक शब्द बंडखोरांना झोंबले नसते तरच नवल होतं. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर सामनाच्या अग्रलेखातूनही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्या याच भाषेवर बोट ठेवत बंडखोरांनी तक्रारीचा सूर आळवला. स्वतः एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत आपली नाराजी जाहीर केली होती.. दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्यासह काही जणांना तर संजय राऊतांनी कार्यकर्ता मेळाव्यात थेट लक्ष्य केलं होतं. बंडखोर आमदारांनीही त्यावरच निशाणा साधला. 

Uddhav Thackeray Resigns : ठाकरे सरकार कोसळलं, आता भाजपचं सरकार येणार हे नक्की...

Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार आहे. सत्तेत वापसी झाल्यानंतर भाजपचं पुढचं लक्ष्य मुंबई महापालिका आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप मुंबईनं ट्वीट केलंय. यह तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है असं ट्विट भाजपनं केलंय. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हातात बॅट घेतल्याचा फोटो पाहायला मिळतोय. या ट्वीटच्या माध्यमातून भाजपनं उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. मुंबई महापालिका जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. आता हीच पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय.

Uddhav Thackeray Resigns : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं

Uddhav Thackeray Resigns : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. यावेळी राज्यपालांसमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरु केली होती. 

Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतणार?

Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होणार आहे. महाराष्ट्रवापसी झाल्यानंतर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असेल याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Uddhav Thackeray Resigns : खुर्ची सोडली! आता नवीन आव्हानं, ठाकरे सरकार कोसळलं

Uddhav Thackeray Resigns : बहुमताची चाचणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आता नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी सुरु झालीय. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. ((एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं  उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला.)) तर दुसरीकडे ज्यांच्या बंडखोरीमुळं हे सत्तांतर घडलं तो शिंदे गट आमदार आज गोव्यातून मुंबईत परतण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे गटाचं भाजप जोरदार स्वागत करणार असल्याचं कळतंय. 

Osmanabad Name change : उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, 25 वर्षांपूर्वीच झाला होता निर्णय

Osmanabad Dharashiv : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज मंजूरी देण्यात आली असली, तरी शिवसेनेची ही मागणी तब्बल 25 वर्षांपूर्वीची आहे. 25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्यानंतर युतीच्या काळात औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. त्यानंतर दोन जणांनी या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. 


उस्मानाबादचे मुळचे नावच धाराशिव आहे. धाराशिव हे नाव 1927 पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर...अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तीही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. औरंगाबाद हे मलिक अंबरने वसविलेले शहर आहे. त्या शहराच्या नामांतराची सेनेची भूमिका राजकीय आहे. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नावे आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी सांगतात. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis Timeline : एकनाथ शिंदेंचं बंड ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा; सत्तासंघर्षाच्या दहा दिवसांत काय-काय घडलं?

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरेंकडून मु्ख्यमंत्री पदाचा त्याग

Uddhav Thackeray Resigns : शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन  खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांचे शेवटचे भाषण ठरले.  उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.


फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्ता स्थापनेचा दावा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


10 दिवसानंतर राजकीय नाट्यावर पडदा
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे  यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाल. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.