Gondia Drunk Teacher : गोंदियात (Gondia) मद्यपी शिक्षकाचा (Drunk Teacher) संतापजनक प्रताप पहायला मिळाला आहे. या शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली. मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.



वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार
विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेचं यथेच्छ मद्यप्राशन करून शाळेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर त्यांनी वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाच्या या प्रकाराने भयभीत विद्यार्थी वर्गाबाहेर पळत जात मुख्याध्यापक तसेच पालकांना माहिती दिली. दरम्यान, मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. हा सर्व प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत गुरुवारी घडला. आर. जी. मरस्कोल्हे असे मद्यधुंद शिक्षकाचे नाव आहे. यानंतर मद्यधुंद शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


 


अनेकांनी शूट केला व्‍हिडीओ 
मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाचे नाव ए. जी. मरसकोल्हे आहे. ते शाळेच्या वेळेतच दारू पिऊन झिंगाट होऊन आले. आणि शाळेत मद्यधुंद अवस्थेत पडलेले दिसले. अनेकांनी त्‍यांचा व्‍हिडीओ देखील केला. या शिक्षकाला दारूची नशा इतकी चढली होती, की आपल्‍या आजूबाजूला काय होत आहे. याचे भान देखील या मद्यपी शिक्षकाला नव्‍हते.


 


संतप्त पालकांची तक्रार


विद्येच्या मंदिरातच हे झिंगाट शिक्षक झोपले असल्‍याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलावले, हा प्रकार पाहताच पालकांनाही धक्का बसला आहे. पालकांनी यांची तक्रार मोठे अधिकारी यांच्‍याकड़े केल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान, पोलिसांनी या शिक्षकाविरूद्ध गुन्‍हा दाखल केला असून मद्यपी शिक्षकावर गोरेगाव ग्रामीण रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षण विभागाने याची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे.


अमरावतीतही असाच प्रकार
ऑगस्ट महिन्यात असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातून समोर आला होता.  मेळघाटमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत चक्क वर्गात दारू पिऊन झोपला होता. त्याचवेळी शाळेतील विद्यार्थी मस्ती करताना दिसून आले. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच परिसरातून संताप व्यक्त केला जात होता. शिक्षक दारू पिऊन वर्गात विचित्र अवस्थेत झोपी गेला होता. त्याचवेळी आपल्याला ऑफ पिरेड मिळाला म्हणून वर्गातील मुलंही धिंगाणा घालताना दिसत होते.


 


इतर बातम्या


Vel Amavasya : हिरवाईचा अपूर्व सोहळा म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा?