मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र त्याबाबत भाजपच्या गोटातून अतिशय मोठी बातमी आहे. आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश भाजपच्या सर्व आमदाराना वरिष्ठांनी दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याचे भाजपच्या सर्व आमदाराना सांगण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. लोकसभेसाठी भाजपने मिशन 45 प्लसचे टार्गेट ठेवलंय. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता भाजपने राज्यातील सर्व आमदारांकडे विशेष जबाबदारी दिली आहे. गणपतीनंतर फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मतदारसंघ बांधण्याचे आदेश देखील सर्व आमदारांना देण्यात आलेत.
शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती. यावरून भाजपने फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खूश करून बाकीच्यांची बोळवण केल्याचीही चर्चा होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून भाजप आणि सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतातानाची स्वप्ने पडतात. पण त्यांचा उद्या काही उजाडत नव्हता. कोणतीही मंत्रीपदं द्या... हे सगळे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसले होते. मात्र मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश भाजपच्या आमदारांना देण्यात आले
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत.
लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?
भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत.
2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं?
महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.
हे ही वाचा :