मुंबई :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)  भाजपने (BJP)  कंबर कसली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप राज्यात 'मिशन 45' राबवणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत  भाजपची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


फडणवीस म्हणाले,  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत  लोकसभेसाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार  आहे. 16  मतदारसंघांमध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्यांचा प्रवासही होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण  दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकानंगले मतदार संघावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.  पुढील 18 महिन्यात काय करायचे हे नियोजन आखले आहे. 


काँग्रेसचे आंदोलन चुकीचे  : देवेंद्र फडणवीस
 
काँग्रेसचे आंदोलनावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे.स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची कंपनी आपल्या ताब्यात घेतली, याची ही चौकशी सुरू आहे. सर्व संपत्ती गांधी परिवाराला मिळाली आहे


बैठकीत काय झाले?


लोकसभा निवडणुकीला दोन वर्ष असताना भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू झाले. शिवसेनेकडे असलेल्या 18 लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन फडणवीसांनी बैठकीत केले आहे. बारामती, कोल्हापूर, सातारा मावळ, उस्मानाबाद, औरंगाबाद हिंगोली या लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :


फडणवीसांच्या रणनीतीने शिवसेना घायाळ


Election 2024: भाजपचं लक्ष्य त्या 144 जागा, जिथं थोड्या फरकानं झाला होता पराभव; BJPकडून खास रणनीती