Nashik News : माणसाकडे धैर्य, साहस आणि सकारात्मक गोष्ट असली कुठलीही गोष्ट सध्या केल्याशिवाय चीन पडत नाही. किंवा कठीणातील कठीण गोष्ट ल;आलाय पार केली जाते. अशीच एक जिद्दीची गोष्ट नाशिकच्या आठ वर्षीय बालकाने आपल्या धाडसावर पूर्ण केली आहे. अबीर मोरे असे या चिमुकल्याचे नाव असून त्याने हिमालय पर्वत रांगेतील अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक पूर्ण केला आहे. 


अबीर मोरे यांचे वडील संदीप मोरे हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्याने अबीरला लहानपणापासूनच खेळाचे बाळकडू मिळत गेले. वयाच्या ४ ते ५ व्या वर्षापासूनच नाशिकच्या आजुबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये ट्रेक करत होता. त्याच्या वडिलांनी एवरेस्ट बेसकॅम्प पुर्ण केल्यापासूनच त्याने हिमालयातील ट्रेक करण्याचा हट्ट धरला होता. त्यानुसार तो नाशिकसह जिल्ह्यातील अनेक स्पर्धांत त्याने सहभाग  घेतला होता.  


डॅाक्टरांचा सल्ला
दरम्यान अबीरचे वय लहान असल्याने डॅाक्टरांचा सल्ला घेऊन तसेच नेपाळ सरकारच्या परवानगी घेऊन अन्नपुर्णा ट्रेक सर करण्याचे त्यांनी ठरवले. नाशिकचे ट्रेकर्स रमेश वाघ,  प्रशांत बच्छाव, नंदिनी दुबे व आनंदिता बरूआ (गोवाहाटी) हे या टीमचे सदस्य होते. अडचणींची सूरूवात प्रवासाच्या सूरूवातीलाच झाली. १२ वर्षाखालील मुलांना कोवीड टेस्ट आवश्यक असल्यामुळे विमानात प्रवेश नाही मिळाला. म्हणून अबीर वडीलांना सोडून अर्ध्या टीम बरोबर विमानतळावर एक दिवस रहावे लागले. दुसऱ्या दिवशी टेस्ट करून काठमांडू गाठत ट्रेक सुरु केला. 


असा झाला प्रवास 
अबीर व त्याच्या टीमने १८ मे रोजी या ट्रेकला सुरूवात केली. रोज १०-१२ किमी चालत त्यांनी धारापानी येथे प्रथम नेपाळ सरकारची ट्रेकची परवानगी घेऊन मलांग, याक खाकरा, लेदर असा खडतर प्रवास केला. २२ मे ला थोरांग हाय कॅंप गाठले. २३ मे ला पहाटे ३ वा टीमने शेवटची समिटची चढाई सूरू केली. या चढाईच्या वेळी जोरात होणारी बर्फवृष्टी, झोबणारे वारे, विरळ होत जाणारा ॲाक्सिजन व भुस्खलनाच्या बाजुने जाणाऱ्या निमुळत्या वाटा या सर्व गोष्टींना न घाबरता त्यांनी साडेसहा तासात सर्वात उंच भाग म्हणजे थोरांग ला पास केला. थोरांग हा अवघड चढा पार केल्यानंतर ते मुक्तिनाथ या ठिकाणी ते आले. 


नेपाळ सरकारकडून दखल 
दरम्यान संपूर्ण ट्रेकच्या प्रवासात अबीरच्या या धाडसी शौर्याचे सर्वजण कौतुक करत होते. त्यातही पाहुण्यांना अबीरकडे बघुन अप्रुप वाटत होते. प्रवासात प्रत्येक भेटणारा व्यक्ती त्याच्या सोबत गप्पा करत सेल्फी काढत स्वत:ला धन्य मानत होते.  शारीरीक थकवा संपूर्ण ट्रेकभर अबीरला कधीच जाणवला नसल्याचे वडील संदीप मोरे यांनी सांगितले. त्याच्या शौर्याची दखल नेपाळ सरकारने घेतली. नेपाळ टुरीझम बोर्डकडून त्यास प्रमाणपत्र देत त्याला गौरवण्यात आले. भारतातील एकमेव सर्वात कमी वय असलेला अन्नपुर्णा सर्कीट ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणारा एकमेव मुलगा असल्याचे बोलले जात आहे.