एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर.... देवेंद्र फडणवीसांचा इशारा

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असं सुनावलं आहे

मुंबई: अडीच वर्षानतंर त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा  देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असं सुनावलं आहे

फडणवीस म्हणाले,  दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात.  त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.  अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायाला लावू नका.. हा त्यांचा थैयथैयाट आहे याला उत्तर देण्याचे कारण नाही. 

संयमानं बोला, फडणवीसांचा इशारा

मोदींचे फोटो लावून निवडून येतात. खुर्चीसाठी लाळघोटपणे करतात. खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे. ते कोणत्याही भाषेतत बोलले असले तरी मला त्यापेक्षा खालच्या भाषेत मला बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. मी तसे बोलणार नाही. संयमानं बोला, असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.  

पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री आहे. अनेकांना अडचणी होत आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहे. मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे. विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा  समजावं  राजा योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले. 

रोशनी शिंदेंवरील हल्ल्यानंतर राजकीय युद्ध

 ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणी आता स्थानिक कार्यकर्त्यांची लढाई राज्यातल्या मातब्बर नेत्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्यांची तपासणी झाली त्यानंतर त्यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र तिथे भेट होऊ शकली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray : फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे हे तर गुंडमंत्री; ठाण्यातील प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget