मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हाती आलेलं पिक उध्वस्त झाल्यानं शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. असं असताना काही पिक विमा कंपन्या ( crop insurance ) शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा पिक विमा कंपन्यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांनी सज्जड दम दिला आहे. अजित पवारांनी म्हटलं आहे की, राज्यात शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असं अजित पवार म्हणाले.



अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार यांनी सांगितलं. आम्ही वेडंवाकडं करा, असं काही सांगत नाही पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


अजित पवारांना वक्तव्याचा विसर! आधी मास्क घालण्यावरुन लेक्चर नंतर आमदारांच्या आग्रहाखातर मास्क काढून भाषण!


आज पत्रकार परिषद घेणार
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी सांगितलंय. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.  तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही,  अशा शब्दात आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिला आहे.