दापोली : दापोली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या  मनसुब्यावर पाणी पडले आहे. दापोली नगरपंचायतीचे 17 उमेदवार असून शिवसेना सहा आणि राष्ट्रवादी आठ असे आघाडीचे 14 उमेदवार व अपक्ष दोन आणि भाजप एक असे नगरसेवक असून यामध्ये महिला नगरसेवक नऊ व पुरुष आठ आहेत. त्यामध्ये भाजपाच्या जया साळवी,अपक्ष कृपा घाग,प्रिती शिर्के यांचा समावेश असून राष्ट्रवादी शिवसेना आघाडी च्या साधना बोत्रे, ममता मोरे,रिया सावंत,अश्विनी लांजेकर,नौसीन गिलगिले, शिवानी खानविलकर, यांचा समावेश आहे.


शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीमध्ये पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पद देण्याचे मान्य करण्यात आले असले तरी पुढील अडीच वर्षाचा विचार करता राष्ट्रवादी साठी फायद्याची ठरू शकतात. या साठी पहिली अडीच वर्षाची टर्म ही शिवसेनेच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साधना बोत्रे या दावेदार ठरू शकतात मात्र शिवसेनेने पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपद घेण्याचे मान्य केले तर  ममता मोरे व तरुण नगरसेवक शिवानी खानविलकर हे या पदाचे प्रमुख दावेदार ठरू शकतात दरम्यान दापोली नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक ही या आघाडीचे किंग मेकर खालीद रखांगे यांच्या भोवती फिरत होती व तेच नगराध्यक्ष होणार असे सांगत विरोधकांनी दापोली मध्ये आपापल्या परिने प्रचार केला होता.


मात्र  27 जानेवारी रोजी पडलेल्या आरक्षणामुळे विरोधकांना धसका बसल्याचे दिसून येत असले तरी या नगराध्यक्ष पदाच्य निवडणुकीवरून विरोधक आता कोणत्या अफवांचा प्रचार करतात याकडे अवघ्या दापोली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


संबंधित बातम्या :