Nashik Water:नाशिकमध्ये आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत : ABP Majha
नाशिकमधील त्र्यंबकेश्वकच्या खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत संपणार आहे. एबीपी माझाच्या बातमीची शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दखल घेतलीय. खरशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. हंडाभर पाण्यासाठीही इथल्या महिलांची होणारी परवड आणि त्यासाठी तिला करावी लागणारी पायपीट एबीपी माझानं दाखवली. याचीच दखल घेत घराघरात पाईपलाईननं पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.