नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खरशेत गावात पाण्यासाठी सुरु असलेले हाल एबीपी माझाने दाखवले होते. यानंतर सरकारने या वृत्ताची दखल घेतली होती. अखेरीस खरशेत गावात नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  गावातील घराघरात नळपाणी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी खरशेत ग्रामपंचायतीतल्या आदिवासी पाड्यांना भेट देणार आहेत. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ शिवसैनिकांना तास नदीवर लोखंडी पूल बसवण्याचे दिले होते आदेश दिले होते. त्यानंतर आता नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महिलांचे हाल थांबणार आहेत. 


नाशिकमधील त्र्यंबकेश्वकच्या खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत संपणार आहे, अशी बातमी एबीपी माझानं दाखवली होती. या बातमीची शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी देखील दखल घेतली. खरशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हंडाभर पाण्यासाठीही इथल्या महिलांची होणारी परवड आणि त्यासाठी तिला करावी लागणारी पायपीट एबीपी माझानं दाखवली होती.  याचीच दखल घेत घराघरात पाईपलाईननं पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.  


जल जीवन मिशन नावाची 3 लाख 60 हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं. अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली.  पण  सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव जे शहरापासून फार दूरही नाही. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी. पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिलांची परवड आणि लहानग्यांचा जीवघेणा प्रवास  एबीपी माझानं दाखवला होता.


संबंधित बातम्या