एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आणि त्यांचा पाणीसाठा

महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आणि त्यांचा पाणीसाठी किती? याबाबतचा आढावा -

मुंबई: राज्यभर सुरु असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, बहुतेक सर्व धरणं भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आणि त्यांचा पाणीसाठी किती? याबाबतचा आढावा - कोयना धरण भरलं, 6 दरवाजे उघडले सातारा जिल्ह्यातलं महत्वाचं असलेलं कोयना धरण भरायला अवघं 1 टीएमसी पाणी कमी आहे. कोयना धरणात 104.17 टीएमसी पाणी साठा आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाचे 6 दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. सध्या कोयना धरणातून नदीत 11 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबादेतील जायकवाडी धरणही झपाट्याने भरत आहे. सध्या धरण 92 टक्के भरलं आहे. जायकवाडी धरण -  सध्या 89 टक्के भरलं. धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर आजचा पाणीसाठा: 1926 दशलक्ष घनमीटर  उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या 100 टक्के भरलं. धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर आजचा पाणीसाठा: 1517 दशलक्ष घनमीटर  धामणी तिकडे पालघर जिल्ह्यातल्या धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत.  पाचही दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण 18800 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीत विसर्ग केला जात आहे. मुळा धरण, निळवंडे धरण शिर्डीतील भंडारदरा आणि मुळा धरणात मुसळधार पाऊस पडतोय. निळवंडे धरणातून 14 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात भंडारदरा धरणात 95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोणत्या धरणात किती पाणी. कोयना - सातारा
  • सध्या 99 टक्के भरलं आहे.
  • धरणाची क्षमता: 2836 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 2806 दशलक्ष घनमीटर
जायकवाडी धरण - औरंगाबाद
  • सध्या 89 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 1926 दशलक्ष घनमीटर
उजनी धरण - सोलापूर 
  • सध्या 100 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 1517 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 1517 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
भातसा धरण - ठाणे
  • सध्या 100 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 942 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 929 दशलक्ष घनमीटर
तिलारी धरण - सिंधुदुर्ग
  • सध्या 100 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 447 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 444 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
पश्चिम महाराष्ट्र खडकवासला - पुणे
  • सध्या 100 टक्के भरलं आहे.
  • धरणाची क्षमता: 56 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 56 दशलक्ष घनमीटर
पानशेत, नीरा देवघर, घोड चिंचणी, चासकमान, डिंभे, पवना, भटघर, भामा आसखेड, वडज आणि वरसगाव ही सर्व धरणं 100 टक्के भरली आहेत दूधगंगा धरण - कोल्हापूर
  • सध्या 100 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 679 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 679 दशलक्ष घनमीटर
राधानगरी धरण - कोल्हापूर
  • सध्या - 100 टक्के भरलं
  • धरणाची क्षमता: 220दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 219 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
वारणा धरण - सांगली
  • सध्या 100 टक्के भरलं आहे.
  • धरणाची क्षमता: 779 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 779 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
नगर- नाशिक, उत्तर महाराष्ट्र मुळा धरण- अहमदनगर
  • सध्या 88 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 609 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 541 दशलक्ष घनमीटर
गिरणा - नाशिक
  • सध्या 64 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 524 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 335 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
हातनूर धरण - जळगाव
  • सध्या 99 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 255 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 252 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
मराठवाडा विभाग जायकवाडी : (पैठण), औरंगाबाद
  • सध्या 89 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 2170 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 1926 दशलक्ष घनमीटर
माजलगाव - बीड
  • सध्या 63 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 311 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 196 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
मांजरा - बीड
  • सध्या 92 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 177 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 163 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
विदर्भातील धरणं ऊर्ध्व वर्धा धरण - अमरावती
  •  सध्या 84 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 564 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 474 दशलक्ष घनमीटर
इसापूर धरण - यवतमाळ
  • सध्या 10 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 964 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 97 दशलक्ष घनमीटर
गोसीखुर्द - भंडारा
  • सध्या 20 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 740 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 151 दशलक्ष घनमीटर
इटियाडोह - गोंदिया
  • सध्या 39 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 318 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 123 दशलक्ष घनमीटर
तोतलडोह - नागपूर
  • सध्या 29 टक्के भरलं.
  • धरणाची क्षमता: 1017 दशलक्ष घनमीटर
  • आजचा पाणीसाठा: 299 दशलक्ष घनमीटर
  • www.abpmajha.in
गोव्यातील धरणे हाउसफुल्ल गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेले पावसाच्या धुमशानामुळे गोव्यातील धरणंही हाऊसफुल्ल झाली आहेत. काल मंगळवारीही संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. 23 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. साळावली, अंजुणे, आमठाणे व पंचवाडी ही धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे धरणाचे दरवाजे खोलण्यात आले असून राज्य सरकारने जनतेला पूरसदृष्य परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget