Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 7 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
पुण्यात आज 776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,056 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
केरळात आज 22,524 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 860 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकात आज 6,151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 436 नव्या रुग्णांची भर पडली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 356 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 949 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 139 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 760 दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे पाच जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
दिल्लीत आज 1,151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात अकोल्यात 13 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या जिल्ह्यात 665 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 66 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद -
राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.60 टक्के आहे. सध्या राज्यात 7 लाख 24 हजार 722 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2394 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 55 लाख 54 हजार 798 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 78,03,700 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तिसऱ्या दिवसी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही -
सलग तीन दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2023 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनास्थिती -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 25 हजार 11 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 1 हजार 979 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दोन लाख 13 हजार 246 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 4 लाख 61 हजार 148 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -