Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 6 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
तेलंगणामध्ये 1,217 नवे कोरोनाबाधित आढळले असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 3 हजार 944 कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहरात 1,434 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 3,896 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासांत मुंबईत 536 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला असून 1153 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
केरळमध्ये 26, 729 नवे कोरोनाबाधित आढळले असून 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आंध्रप्रदेशमध्ये नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 2,690 नवे कोरोनाबाधित मागील 24 तासांत आढळले आहेत.
लदाख येथे 111 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
ओडिसा राज्यात 2,106 नवे कोरोनाबाधित आढळले असून 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
झारखंड राज्यात 449 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रविवारी दिल्ली येथे 1,410 नवे कोरोनाबाधित आढळले असून 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 2,506 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 8,869 सक्रिय रुग्ण दिल्लीमध्ये आहेत.
पार्श्वभूमी
Corona Updates : मागील काही काळांपासून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 7 हजार 474 नवे रुग्ण आढळून आले असून 865 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सकारात्मकतेचे प्रमाण सुमारे आठ टक्के आहे. तर राज्याचा विचार करता राज्यात शनिवारी कोरोनाच्या 11 हजार 394 नव्या रुग्णांची भर पडली असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 24 तासांत 21 हजार 667 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसंच राज्यात शनिवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. दरम्यान देशासह राज्यातील विविध ठिकाणांची कोरोनाची ताजी आकडेवारी जाणून घेऊया...
देशातील कोरोनास्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 25 हजार 11 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 1 हजार 979 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दोन लाख 13 हजार 246 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 4 लाख 61 हजार 148 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -