Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 29 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 29 Jan 2022 02:59 PM
आज राज्यात 27,971 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 50,142 रुग्ण कोरोनामुक्त

आज राज्यात 27,971 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50,142 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात 85 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. 

मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.  

गडचिरोली जिल्हयात आज 374 कोरोनामुक्त, नवीन 268 कोरोनाबाधित

गडचिरोली: आज गडचिरोली जिल्हयात 904 कोरोना तपासण्यांपैकी 268 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 374 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32497 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1233 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 755 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.58 टक्के तर मृत्यू दर 2.19 टक्के झाला आहे.

चंद्रपूरमध्ये आज 392 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये आज 392 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चंद्रपूरमध्ये 3286 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मात्र मृतांचा आकडा शंभरी पार


मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या  24 हजार 948 नव्या रुग्णांची भर पडली असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 45 हजार 648  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात शुक्रवारी 110 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात शुक्रवारी110  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 3040 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1603 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 




राज्यात शुक्रवारी 103 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 42 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के आहे.  सध्या राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 41 लाख 63 हजार 858 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची सख्या वाढली


गेल्या 24 तासांत मुंबई 1 हजार 312 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 14 हजार 344 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1 हजार 312 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 591 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 4 हजार 990 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून 97 टक्के झाला आहे.  




राज्यात आज 103 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


India Coronavirus Update : भारतासह जगभरात ओमायक्रॉन प्रकारांमुळे कोरोनाची तिसरी लाट अद्यापही कायम आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वात वाईट परिस्थिती कायम आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 54 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.