Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 28 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 28 Jan 2022 05:38 PM
मुंबईत आज 1,312 रुग्णांची नोंद तर 10 जणांचा मृत्यू

मुंबईत शुक्रवारी 1 हजार 312 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 591 झाली आहे. तर गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 990 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून 97 टक्के झाला आहे.  

परभणी जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम 

परभणीत सलग दुसऱ्या दिवशी 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. 2 हजार 911 तपासण्यामध्ये 654 नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. 232 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 3 हजार 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी 24 तासात राज्यात कोरोनाच्या  25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 36 हजार 708  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात 72 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात गुरुवारी 72  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत 2930 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 









राज्यात गुरुवारी 42 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद








राज्यात गुरुवारी 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.  सध्या राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 958 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे कोरोनाबाधित 


 मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 384 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 581 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.