Maharashtra Covid-19 cases Live Updates : राज्यात आज 973 नवे रुग्ण आढळले, 12 जणांचा मृत्यू

Maharashtra Covid-19 cases Live Updates 26 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2022 03:24 PM
Thane : ठाण्यात आज 21 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

ठाण्यात आज 21 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

Pune : पुण्यात आज 174 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुण्यात आज 174 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  पिंपरी चिंचवड मनपामध्ये 66 रुग्णांची नोंद झाली आहे. 

Maharashtra : शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर

Maharashtra :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 % एवढे झाले आहे.

Mumbai : मुंबईत शनिवारी 89 रुग्णांची नोंद

मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्यामध्ये सातत्याने घट होत आहे. शनिवारी मुंबईत फक्त 89 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज आढळलेल्या 89 रुग्णांपैकी फक्त 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सहा रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 89 रुग्णांपैकी 69 रुग्णांना कोणताही लक्षणे नाहीत, त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Delhi : दिल्लीत आज 440 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Delhi : दिल्लीत आज 440 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.    गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  973 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात आज 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज  22 महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू तर तीन महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला झालेला नाही.  


राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 4629 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 173 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.


राज्यात आज  12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद










राज्यात आज 12  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख  7 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे.  सध्या राज्यात  1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 746  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58  हजार 977 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


मुंबईत आज 128 नवे कोरोना रुग्ण


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 128 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 014 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 128 रुग्णांपैकी 15 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 102 बेड्सपैकी केवळ 721 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.


 मुंबईत (Mumbai) नव्या कोरोनाबाधितांची संख्या आजही कायम राहिली आहे. नव्या 128 कोरोनाबाधितांची नोंद आज झाली आहे. कमी रुग्णसंख्येमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका प्रशासन (Mumbai BMC) निर्बंधामध्ये आणखी शिथिलता आणणार का? हे पाहावं लागेल. मुंबईत आज एकाही कोरोनाबाधिताचा (Corona Deaths) मृत्यू झालेला नाही.


मुंबईतील रुग्ण दुपटीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. काल 4 हजार पार गेलेल्या या दरात आज आणखी वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 4 हजार 238 इतका झाला आहे. मुंबईत सद्यस्थितीला एकही इमारत सील करण्यात आलेली नाही.









- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.