Pradnya Jaiswal: बॉलीवूड आणि क्रिकेटमधील नाते नवीन नाही. शर्मिला टागोर-मन्सूर अली खानपासून अनुष्का शर्मा-विराट कोहलीपर्यंत, या जगाने अनेक रोमँटिक जोड्या पाहिल्या आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाण्याची चर्चा आहे – अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल आणि युवा क्रिकेटर शुभमन गिल. बॉलिवूडच्या अशा कितीतरी अभिनेत्रींच्या डेटींगलिस्टमध्ये क्रिकेटर आहे. काही महिन्यांपूर्वी सारा अली खान हिसं नाव शुभमन गिलशी जोडलं जात होतं. आता अभिनेत्री प्रज्ञा जैसवाल शुभमनला डेट करण्याच्या इच्छेमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एक मुलाखतीत प्रज्ञा जैसवालनं जर संधी मिळाली तर शुभमन गिलला डेट करायला आवडेल. शुभमन तिला क्यूट वाटतो. असंही ती या मुलाखतीत म्हणाली होती.प्रज्ञा जैसवाल नुकतीच अभिनेता अक्षय कुमारसोबत खेल खेल में चित्रपटात दिसली होती. फिल्मीज्ञानला केलेल्या बातचितीनंतर प्रज्ञानं शुभमनला डेट करण्याविषयी सांगितलं.


जोडी बना दो यार...


प्रज्ञाला खरंतर एका फॅन कमेंटमध्ये असं कोणीतरी सांगितलं होतं की प्रज्ञा आणि शुभमन गिल कपल म्हणून चांगले दिसतील. यावर प्रज्ञानं लाजत, हो तो खरच फार क्यूट आहे. चला मग, जर तुम्हा सगळ्यांना असं वाटतं असेल तर मला  क्रिकेटशी काही प्रॉब्लेम नाही. तो खूप चांगला माणूस आहे.


नशिबात हेच असेल तर ते योग्यच..


एखाद्या क्रिकेटरला डेट करशील का असं विचारलं असता प्रज्ञा जैयस्वाल म्हणाली,नशिबात हेच लिहिले असेल तर ते योग्यच आहे. हे शक्य होऊ शकते. मला क्रिकेटपटूंबद्दल कोणतीही नापसंती नाही. व्यक्ती चांगली असेल तर कपल होण्यास काही अडचण येत नाही. प्रज्ञाने 2014 मध्ये तमिळ थ्रिलर विराट्टूमधून आपल्या फिल्मी प्रवासाला सुरुवात केली. तेलुगू चित्रपटांतून तिने दक्षिणेतील चाहत्यांमध्ये आपली छाप सोडली. आता, तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत खेल खेल में या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क, तापसी पन्नू आणि आदित्य सील यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.


यापूर्वी साराचं नाव जोडलं गेलं शुभमनशी..


यापूर्वी सारा अली खान, अनन्या पांडे आणि टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितसोबतही शुभमन गिलचं नाव जोडलं गेलं होतं. रिद्धिमा पंडित शुभमन गिलसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. साराने एकदा करण जोहरच्या चॅट शोमध्ये स्पष्ट केले होते की सारा, जिचे नाव शुभमन गिलसोबत जोडले जात आहे, ती प्रत्यक्षात तिचं नसून  सचिन तेंडुलकरच्या मुलीचं आहे.