Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 18 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2022 03:58 PM
परभणीत आज 819 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

परभणीत आज पाच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Solapur : सोलापूरात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Solapur : सोलापूरात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 63 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Maharashtra : महाराष्ट्रात आज 2068 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी दोन हजार 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार हजार 709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Mumbai : मुंबईत शुक्रवारी 202 नवे रुग्ण,

Mumbai : मुंबईत शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून 202 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 365 कोरोनामुक्त झाले आहेत.

Akola : अकोल्यात आज 46 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Akola : अकोल्यात आज 46 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 182 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 797 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून   रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 383  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत



राज्यात आज  40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख  81 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 51 हजार 023 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1146  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 68 लाख 76  हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुंबईत   259 नवे कोरोनाबाधित 


मुंबईत (Mumbai) आज 259 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) चारने वाढली आहे, कारण मंगळवारी 255 नव्या बाधितांची नोंद झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी आजही मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 202 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2205 इतका होता.  



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.