नाशिक : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र माघारीनंतर आता स्पष्ट झाले आहे. 15 विधानसभा मतदारसंघातून 337 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी 141 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी उमेदवार कळवण विधानसभा मतदारसंघात आहेत. दम्यान निवडणुकीत नांदगावमधून माजी खासदार समीर भुजबळ, इगतपुरीत माजी आमदार निर्मला गावित, देवळालीतून शिंदे सेनेच्या राजश्री अहिरराव तर चांदवड-देवळा मतदारसंघातून केदा आहेर यांनी बंडखोरी केली आहे. माघारीसाठी सोमवारी महायुती आणि मविआच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील उमेदवारांची बाजू भक्कम करण्यासाठी बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न केले जात होते. त्यात काही ठिकाणी यश आले तर नांदगाव, इगतपुरी, चांदवड, देवळाली या चार मतदार संघात मात्र बंडखोरी कायम राहिली.
नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, तर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक आमदार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | नाशिक पूर्व |
ॲड. राहुल ढिकले (भाजप) |
गणेश गीते |
प्रसाद सानप (मनसे) | |
2 | नाशिक मध्य |
देवयानी फरांदे (भाजप) |
वसंत गीते (ठाकरे गट) |
मुशिर सय्यद (वंचित) | |
3 | नाशिक पश्चिम | सीमा हिरे (भाजप) | सुधाकर बडगुजर (ठाकरे गट) | दिनकर पाटील (मनसे) दशरथ पाटील (स्वराज्य पक्ष) |
|
4 | देवळाली |
सरोज आहेर (अजित पवार गट) |
योगेश घोलप (ठाकरे गट) | अविनाश शिंदे (वंचित) | |
5 | इगतपुरी | हिरामण खोसकर - (अजित पवार गट) |
लकी जाधव (काँग्रेस) | काशिनाथ मेंघाळ (मनसे) निर्मला गावित - अपक्ष |
|
6 | दिंडोरी | नरहरी झिरवाळ (अजित पवार गट) |
सुनिता चारोस्कर (शरद पवार गट) | ||
7 | कळवण | नितीन पवार (अजित पवार गट) |
जे पी गावित (माकप) | ||
8 | निफाड | दिलीप बनकर (अजित पवार गट) | अनिल कदम (ठाकरे गट) | गुरुदेव कांदे (प्रहार) | |
9 | सिन्नर | माणिकराव कोकाटे (अजित पवार गट) | उदय सांगळे (शरद पवार गट) | ||
10 | नांदगाव | सुहास कांदे (शिंदे गट) | गणेश धात्रक (ठाकरे गट) | समीर भुजबळ (अपक्ष) | |
11 | येवला | छगन भुजबळ (अजित पवार गट) | माणिकराव शिंदे (शरद पवार गट) | ||
12 | चांदवड | राहुल आहेर (भाजप) |
शिरीष कोतवाल (काँग्रेस) |
केदा आहेर (अपक्ष) | |
13 | बागलाण |
दिलीप बोरसे (भाजप) |
दीपिका चव्हाण (शरद पवार गट) | ||
14 | मालेगाव बाह्य |
दादा भुसे (शिंदे गट) |
अद्वय हिरे (ठाकरे गट) | ||
15 | मालेगाव मध्य |
एजाज बेग (काँग्रेस) शान ए हिंद (समाजवादी पार्टी) |
मुक्ती मोहम्मद इस्माईल (एम आय एम) आसिफ शेख (अपक्ष) |
आणखी वाचा